जामखेड नगरपरिषद निवडणूक हाय होल्टेज उपमुख्यमंत्री यांच्या नंतर आता थेट मुख्यमंत्री जामखेड मध्ये सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार तळ ठोकून

0
840

जामखेड न्युज——

जामखेड नगरपरिषद निवडणूक हाय होल्टेज

उपमुख्यमंत्री यांच्या नंतर आता थेट मुख्यमंत्री जामखेड मध्ये

सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार तळ ठोकून

जामखेड नगरपरिषद निवडणुक मोठ्या रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना उमेदवारासाठी जाहीर सभा झाली तर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. त्यामुळे जामखेड नगरपरिषद निवडणुक हाय होल्टेज ठरत आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व काँग्रेस बरोबर तिसरी आघाडी असे पॅनल स्वतंत्र पणे उभे आहेत. सभापती प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार तळ ठोकून जामखेड शहरात आहेत. आणि गल्लोगल्ली फिरत आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेड शहरात जाहीर सभा घेत शिवसेनेत नवचैतन्य निर्माण केले व नगरपरिषद शिवसेनेच्या ताब्यात दिल्यास जामखेड चा कायापालट करू जामखेड चा विकास खुटण्यास दोन्ही दिग्गज नेते जबाबदार आहेत असे शिंदे यांनी जामखेड येथे जाहीर सभेत सांगितले.

जामखेड साठी दोन दिग्गज नेते असताना अनेक समस्या आहेत. जर जामखेड नगरपरिषद शिवसेनेच्या ताब्यात दिली तर शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, मल्लनिस्सार या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील असे जाहीर केले. यामुळे शिवसेना जोमात आली आहे.

तसेच काँग्रेस व तिसरी आघाडी यानीही प्रचारात जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. यामुळे शहरात नामशेष होत चाललेला पंजा सध्या जोमात आला आहे. जाहीर प्रचारात एकमेकांच्या उमेदवारांच्या कुंडल्या काढल्या जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या सभेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभा झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने आमदार सुनील शेळके, शिवसेनेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सकाळी होत आहे परत सायंकाळी आमदार रोहित पवार यांची सभा होत आहे यामुळे आरोप प्रत्यारोप राळ उडणार आहे.

याच अनुषंगाने नगरपरिषदे निवडणूकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेड येथे सभा आयोजित केली आहे. या सभेमध्ये मुख्यमंत्री व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रा. राम शिंदे यांनी केलेली जामखेड शहरातील पाणीपुरवठा योजना, रस्ते. मलनिस्सारण यासह अनेक कामांसाठी आणलेल्या निधी व आगामी काळात करण्यात येणारा विकास यावर मुख्यमंत्री बोलतील असे वाटते.

एकंदरीत जामखेड नगरपरिषद निवडणूक हाय होल्टेज ठरत चालली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here