कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात दोन रोहित पवार तर तीन राम शिंदे
227 कर्जत जामखेड मतदारसंघात आज छाननी अंती एकुण 23 उमेदवार शिल्लक राहिले होते. यापैकी एका उमेदवाराने पहिल्या दिवशी तर आज अकरा उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली यामुळे आता अकरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात दोन रोहित पवार तर तीन राम शिंदे उभे आहेत.
मागील पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत रोहित पवार यांना १ लाख ३५ हजार ८२४ मते मिळाली. तर भाजपच्या राम शिंदे यांना दुसऱ्या क्रमाकांची ९२ हजार ४७७ मते मिळाली होती. 43347 मतांनी रोहित पवार विजयी झाले होते.
बुधवार दि. 30 रोजी छाननी अंती एकुण 23 उमेदवार शिल्लक राहिले होते. आज सोमवार दि. 4 नोव्हेंबर रोजी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अकरा उमेदवारांनी माघार घेतली व आगोदर एक अशा बारा उमेदवारांनी माघार घेतली यामुळे एकुण अकरा उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
पुढील अकरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
दत्तात्रय आत्माराम सोनवणे -बहुजन समाज पार्टी चिन्ह हत्ती रामदास शंकर शिंदे – भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ
रोहित राजेंद्र पवार – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस
करण प्रदिप चव्हाण – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चिन्ह ट्रक
राम प्रभू शिंदे -आँल इंडिया फाँर्वर्ड ब्लॉक चिन्ह सिंह
पुढील बारा उमेदवारांनी माघार घेतली आहे. दि. 31 आक्टोबर रोजी रोहित सुरेश पवार यांनी माघार घेतली होती आणि आज शेवटच्या दिवशी अकरा उमेदवारांनी माघार घेतली. आशाबाई राम शिंदे युनुस दगडू शेख हनुमंत देविदास पावणे आप्पा नवनाथ पालवे शेटे पोपट नवनाथ विकास मिठ्ठुलाल मासाळ अँड. कैलास शंकरराव शेवाळे अंबादास शंकर पिसाळ विकास भगवंत राळेभात कोठारी रवींद्र लिलाचंद स्वप्नील पोपटलाल देसाई
अशा प्रकारे अकरा उमेदवार आपले नशीब आजमात आहेत. यामुळे आता एकच बँलट युनिट मशीन राहणार आहे.
नाव व आडनाव साधर्म्य असणारे राम शिंदे नावाचे तीन तर रोहित पवार नावाचे दोन उमेदवार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार रोहित पवार यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे तर अपक्ष उमेदवार रोहित पवार यांचे चिन्ह ट्रम्पेट आहे. नाव साधर्म्य व चिन्ह साधर्म्य असेच आहे.
भाजपाचे आमदार राम शिंदे यांचे चिन्ह कमळ तर नाव साधर्म्य असणारे राम प्रभू शिंदे यांचे चिन्ह सिंह तर राम नारायण शिंदे यांचे चिन्ह भेंडी चिन्ह आहे.