कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार यांची माघार
राज्यातील हाय होल्टेज लढत म्हणून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ ओळखला जात आहे. या ठिकाणी माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार अशी लढत होत आहे. यात एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाहीत.
रोहित पवार नावाचे तीन उमेदवार होते तसेच राम शिंदे नावाचे तीन उमेदवार आहेत यापैकी रोहित सुरेश पवार रा. बहिरोबावाडी ता. कर्जत जि. अहिल्यानगर यांनी आज माघार घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच रंगतदार झाले आहे. निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यातील अनेक महत्वाच्या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याठिकाणी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित राजेंद्र पवार विरुद्ध आमदार प्रा. राम शंकर शिंदे असा थेट सामना होत आहे. यात नाव साधर्म्य असणारे उमेदवार शोधून त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास नेत्यांनी भाग पाडले आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित राजेंद्र पवार, रोहित चंद्रकांत पवार, रोहित सुरेश पवार असे तीन रोहित पवार होते यापैकी रोहित सुरेश पवार यांनी आज माघार घेतली आहे.
तसेच प्रा. राम शंकर शिंदे, राम प्रभू शिंदे, राम नारायण शिंदे असे तीन राम शिंदे उमेदवार आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या म्हणजे मंगळवार पर्यंत 38 जणांनी 79 अर्ज नेले होते यापैकी 23 जणांनी 37 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी रोहित सुरेश पवार यांनी माघार घेतली आहे.
एकाच नावाचे तीन तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.