श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताहात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार संपन्न

0
409

जामखेड न्युज——

श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताहात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार संपन्न

हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात आश्विन वद्य १ शुक्रवार दिनांक 18 पासून सुरूवात झालीहोती. तर सांगता आज आश्विन वद्य ९ शुक्रवार २५ रोजी सांगता ह. भ. प. उत्तम महराज वराट यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. सायंकाळी ह.भ.प. ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे हासेगावकर अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले यानंतर परिसरातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण घेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल साक्षी विनोद वराट, दहावीच्या परीक्षेत 96.80 टक्के गुण घेत जामखेड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शिवरत्न कैलास वराट, श्रेया कैलास वराट हिची एमबीबीएस साठी निवड झाल्याबद्दल तर ज्ञानेश्वरी रामहरी वराट व सचिन हनुमंत वराट यांची बीएचएमएस साठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या वर्षात पोलीस पदावर नियुक्ती झालेले बाबासाहेब कडभने, ऋषिकेश नेमाने, ऋषिकेश घोलप, सागर काळे यांचा सन्मान करण्यात आला
कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी पदावर नियुक्ती झालेले संभाजी परमेश्वर कोल्हे तर अविराज हनुमंत वराट यांची मंत्रालयात लिपीक झाल्यावर सत्कार करण्यात आला.
श्री साकेश्वर विद्यालयायाती विद्यार्थी शुभम घोडेस्वार याने नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर सिद्धी अर्जुन हिची थाळीफेक राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी हभप महादेव महाराज रासकर, हभप मनोहर इनामदार, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, श्रीराम मुरूमकर, मुख्याध्यापक दत्ता काळे, भरत लहाने, सुनिल वराट, अजित वराट, राजकुमार थोरवे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, सचिन वराट, महादेव मुरूमकर, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४२ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
किर्तन सेवेसाठी नामवंत महाराज, वादक, गायक
उपस्थित किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हभप पंडित केशव महाराज जगदाळे, जालिंदर बप्पा येडशीकर, भरत पठाडे, आसाराम महाराज साबळे, बाजीराव महाराज वराट, मदन महाराज टिपरे, उत्तरेश्वर महाराज टिपरे, बाळू सुरवसे, मच्छिंद्र वाळेकर, हरिदास आबा गुंड, दिपक अडसूळ आहेत.

गायनाचार्य – हभप बिभीषण महाराज कोकाटे, हरीभाऊ महाराज काळे, कृष्णा महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, भरत महाराज साठे, नामदेव चव्हाण, अशोक सपकाळ, दिनकर मुरूमकर, भास्कर फुंदे, केशव घोलप, विष्णू म्हेत्रे, दादा आजबे, भाऊसाहेब कोल्हे, पंढरीनाथ राजगुरू, भरत घोलप, आण्णा घुमरे, गहिनीनाथ सकुंडे, प्रकाश महारनवर, नाना महारनवर, जालिंदर महारनवर, कल्याण राऊत, दत्ता घुमरे सह परिसरातील सर्व भजनी मंडळे, भजन कीर्तन व्यवस्थापक श्रीकांत वराट, पांडुरंग अडसूळ, रामकिसन लहाने, दिपक अडसूळ यांच्या सह परिसरातील भजनी मंडळे गावातील भजनी मंडळ व नर्मदेश्वर वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थी सात दिवस हजर राहतील.

सप्ताहाचे संयोजक म्हणून हभप विवेकानंद भारती महाराज उर्फ उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट व उत्तरेश्वर महाराज वराट फोटोग्राफर ओम दळवी असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here