जामखेड न्युज——
मनसेची दुसरी यादी, कर्जत जामखेड, श्रीगोंदा, आष्टी व गेवराई चे उमेदवार जाहीर
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने विधानसभेसाठी ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड व श्रीगोंदा तर बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा व गेवराई मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत.
कर्जत जामखेड मध्ये रविंद्र कोठारी, श्रीगोंदा संजय शेळके, आष्टी पाटोदा मध्ये कैलास दरेकर तर गेवराई मध्ये मयुरी म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?
कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) पाटील
माहिम – अमित राज ठाकरे
भांडुप पश्चिम – शिरीष सावंत
वरळी – संदीप देशपांडे
ठाणे शहर – अविनाश जाधव
मुरबाड – संगिता चेंजवणकर
कोथरुड – किशोर शिंदे
हडपसर – साईनाथ बाबर
खडकवासला – मयुरेश वांजळे
मागाठाणे – नयन कदम
बोरीवली – कुणाल माईणकर
दहिसर – राजेश येरुणकर
दिंडोशी – भास्कर परब
वर्सोवा – संदेश देसाई
कांदिवली पूर्व – महेश फरकासे
गोरेगाव – विरेंद्र जाधव
चारकोप – दिनेश साळवी
जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे
विक्रोळी – विश्वजित ढोलम
घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
घाटकोपर पूर्ण – संदीप कुलथे
चेंबूर – माऊली थोरवे
चांदिवली – महेंद्र भानुशाली
मानखुर्द-शिवाजीनगर – जगदीश खांडेकर
ऐरोली – निलेश बाणखेले
बेलापूर – गजानन काळे
मुंब्रा – कळवा – सुशांत सूर्यराव
नालासोपारा – विनोद मोरे
भिवंडी पश्चिम – मनोज गुळवी
मिरा-भाईंदर – संदीप राणे
शहापूर – हरिश्चंद्र खांडवी
गुहागर – प्रमोद गांधी
कर्जत-जामखेड – रवींद्र कोठारी
आष्टी – कैलास दरेकर
गेवराई – मयुरी म्हस्के
औसा – शिवकुमार नागराळे
जळगांव शहर – अनुज पाटील
वरोरा – प्रवीण सूर
सोलापूर दक्षिण – महादेव कोगनुरे
कागल – रोहन निर्मळ
तासगांव-कवठे महाकाळ – वैभव कुलकर्णी
श्रीगोंदा – संजय शेळके
हिंगणा – विजयराम किनकर
नागपूर दक्षिण – आदित्य दुरूगकर
सोलापूर शहर- उत्तर – परशुराम इंगळे
दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. कल्याण ग्रामीणमधून मनसे आमदार राजू पाटील यांनी महायुती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम केलं होतं. आता विधानसभा निवडणुकीसाठी मनसे एकला चलो रेचा नारा देत स्वतंत्र उमेदवार दिले असून राज ठाकरे यांनी दुसरी यादी जाहीर करत त्यांच्या ४५ उमेदवारांची नावं जाहीर केली आहे.