जामखेड न्युज——
शिवसेना तालुकाप्रमुखपदी अँड. मयुर डोके यांची निवड, खा. संजय राऊत यांनी बांधले शिवबंधन
मुंबई येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत सोमवारी जामखेड तालुक्यातील शिवसैनिकांची बैठक होऊन या बैठकीत शिवसैनिक अँड. मयुर डोके यांची जामखेड तालुका शिवसेना प्रमुखपदी निवड करण्यात आली. या निवडीचे जामखेड तालुक्यातून स्वागत होत आहे.
मुंबई येथे सोमवारी शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्या उपस्थितीत अँड. मयुर डोके यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी जामखेड तालुका शिवसेनेचे बैठक घेण्यात आली.
यावेळी अहिल्यानगर शिवसेना जिल्हा संपर्क आ.सुनिल शिंदे, कर्जत-जामखेड विधानसभा संपर्क प्रमुख जगदीश चौधरी, अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हा उपप्रमुख रावजी नांगरे उपस्थित होते. यावेळी जामखेड तालुका शिवसेना प्रमुखपदी अँड. मयुर डोके यांची निवड जाहीर करण्यात आली.
खा.संजय राऊत यांनी अगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिक मोठय़ा निष्ठेने प्रयत्न करतील व राज्यात महाविकास आघाडीतीचे सरकार आणण्यासाठी हातभार लावतील. लवकरात लवकर तालुक्याची कार्यकारीणी निवड करावी असे आवाहन केले.
यावेळी जामखेड शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे, गणेश उगले,विभाग प्रमुख संतोष शिंदे, शिवसैनिक रावजी नांगरे, विपुल पटेल, रावसाहेब नेटके, सतिष पवार, सुरज मुळे, विष्णु गर्जे, निलेश माने, अल्तमाश शेख, किरण कोल्हे, सुयोग सोनवणे, मारुती वराट, नामदेव तावरे, ओम सानप, शुभम वराट, किरण बनकर, दिपक वराट, महेश मुरुमकर, तेजस पटेकर, कृष्णा रंधवे, निलेश नेटके, अशोक जाधव आदी उपस्थित होते.