जामखेड न्युज——
मतदार जनजागृती अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल राजुरी मध्ये विविध उपक्रम
प्रभात फेरी, रांगोळी, फलक लेखन, लोकशाही प्रतिज्ञा
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जामखेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल राजुरी येथे मतदार जागृती करण्यासाठी प्रभात फेरी, रांगोळी, विद्यार्थी व शिक्षक लोकशाही प्रतिज्ञा व फलक लेखन अशा विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली.
आज दिनांक 21/ 10/ 2024 रोजी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जनजागृती अभियाना अंतर्गत प्रभात फेरी ,रांगोळी, विद्यार्थी व शिक्षक लोकशाही प्रतिज्ञा व फलक लेखन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक पारखे बी.ए., राजेंद्र पवार, श्रीमती सुनिता पिसाळ, दिपक सुरवसे, जाहेद बागवान, सुभाष बोराटे, अक्षय मोहिते, बाबासाहेब समुद्र, शिक्षकेतर कर्मचारी उमराव लटपटे, सदाफुले व हनुमंत राऊत आणि सर्व ग्रामस्थ माननीय सरपंच, उपसरपंच माजी सरपंच उपस्थित होते.
भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. ‘जनतेचे राज्य’ ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे.
यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्विप कार्यक्रम राबविला जातो. तसेच नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी याकरिता राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात.
निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते.
न्यू इंग्लिश स्कूल राजुरी मध्ये विविध उपक्रम राबविल्या बद्दल तहसीलदार गणेश माळी, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले आहे.