जामखेड न्युज——
शिवसेना कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख गणेश उगले तर जामखेड तालुका प्रमुख म्हणून मयूर डोके यांची निवड
आज शिवसेना भवन मुंबई येथे झालेल्या शिवसेना बैठकीत जामखेड तालुका शिवसेना प्रमुख गणेश उगले यांना बढती देत कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे तर तालुका प्रमुख म्हणून मयुर डोके यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे युवा वर्गात चैतन्याचे वातावरणात निर्माण झाले आहे.
गणेश उगले यांची नुकतीच शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या कामाची तळमळ, पक्षावरील निष्ठा बरोबर असणारा युवा यामुळे थोड्याच दिवसात पक्षाने उगले यांना बढती देत कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. तसेच मयुर डोके यांना तालुका प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. दोघा युवावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपावली आहे.
गणेश उगले यांना कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख तर मयुर डोके यांना तालुका प्रमुख म्हणून पत्र देताना पत्रात म्हटले आहे की, शिवसेना प्रमुख हिंदुदय सम्राट वंदनीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याआशिर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरुन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार श्री. सुनिलजी शिंदे साहेब व विधानसभा संपर्क प्रमुख श्री. जगदीश चौधरी यांचे मार्गदर्शनावरुन आपली शिवसेना कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख या पदावर आपली निवड करण्यात येत आहे.
गणेश उगले यांना कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख तर मयुर डोके यांना तालुका प्रमुख म्हणून पत्र देताना पत्रात म्हटले आहे की, शिवसेना प्रमुख हिंदुदय सम्राट वंदनीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याआशिर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरुन खासदार शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार श्री. सुनिलजी शिंदे साहेब व विधानसभा संपर्क प्रमुख श्री. जगदीश चौधरी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हा प्रमुख रावजी भांगरे किरणजी बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली उगले व डोके यांना पत्र देण्यात आले.
आज रोजी अँड. मयूर नवनाथ डोके पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आज रोजी शिवसेना नेते मा. संजयजी राऊत साहेब यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला. अँड मयूर डोके पाटील यांना शिवसेना जामखेड तालुका प्रमुख पदी नियुक्ती केली. व गणेश बाबसाहेब उगले यांची कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती केली. यावेळेस शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे, विभाग प्रमुख संतोष शिंदे, शिवसैनिक रावजी नांगरे विपुल पटेल, रावसाहेब नेटके, सामिष पवार,सुरज मुळे, विष्णु गर्ने, निलेश माने, अल्तमश शेख फ्रेंड किरण कोल्हे, सुयोग सोनवणे, मारुती वराट, नामदेव तावरे, ओम सानप,शुभम वराट, किरण बनकर, दिपक वराट, महेश मुरुमकर, तेजस पटेकर, निलेश नेटके, कृष्णा रंधवे, अशोक जाधव, रॉबिन पटेल यांच्या सह अनेक शिवसैनिक हजर होते.
हिंदुत्वाशी व मराठी माणसांशी एक अतुट नात शिवसेना प्रमुखांनी सर्वाशी कुटुंबप्रमुखा प्रमाणे जोडले आहे. म्हणूनच त्यांना हिंदुहृदयसम्राट सम्राट म्हणून गौरविले गेले. शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादाने आज संघटना आपल्या सारख्या कार्यकत्यांच्या बळावर उभी आहे.
८०% समाजकारण व २०% राजकारणआहे. घरा-घरात व गावा-गावात संघटना उभी करून संघटनेचे कार्य जोमाने चालु आपल्या धगधगत्या हिंदुत्वाचा बाणा हिंदुत्वाची पताका आपल्या माध्यमातून यशस्वी रित्या पुढे न्यायची आहे.
आज संघटनेची वाटचाल जोमाने सुरु करताना अनेक संकटाना धैर्याने तोंड देत आहे. त्यामुळे संघटना सर्वत्र पोहोचली आहे.पताका समाजाला युवा शक्तीला संघटनेच्या पाठीशी आई तुळजा भवानीचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतील आपण आपल्या पदाच्या माध्यमातून चांगले कार्य करावे हिच सदिच्छा संघटनेची शिस्त व आदेशाचे तंतोतंत पालन करावे.