जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना ख-या अर्थाने शिक्षण प्रवाहात आणून ज्ञानदानाचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले त्यामुळे ‘रयत’ च्या विद्यार्थ्यांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील हेच महर्षी व्यास होत असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य रमेश वराट यांनी केले.
‘गुरुपौर्णिमा’ निमित्त श्री अरण्येश्वर विद्यालय अरणगाव येथे सुरक्षित अंतर ठेवून या वर्षी दहावीत विद्यालयात प्रथम आलेली विद्यार्थिनी प्रतिक्षा ढवळे व प्राचार्य रमेश वराट यांचे हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करण्यात आली.
या प्रसंगी विद्यालयात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
प्रथम क्रमांक कु. प्रतिक्षा बाळासाहेब ढवळे (96.40%)
द्वितीय क्रमांक मिसाळ वैभब बाळू(94%)
तृतीय क्रमांक कु. पारे कल्याणी संदिप (91.40%)
तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.