जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
बर्याच दिवसांपासून फरार असलेला दरोड्याच्या गुन्हयातील कुविख्यात दरोडेखोर लखन जिंतूर भोसले यास जामखेड पोलीसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच त्यांच्या कडून दरोड्यातील मुद्देमाल जप्त केला आहे
दिनांक 12/4/2021 रोजी सकाळी 11/00 वा.च्या सुमारास फिर्यादी नामे उमेश राम गिरी वय-41 वर्ष धंदा कॅटरिंग रा.एम.आय.डी.सी.रोड ,वाई ता.वाई जि.सातारा यांना व त्यांची पत्नी यांना डिसलेवाडी गावाच्या शिवारात दरोडा टाकुन लुटण्यात आले होते.त्यावरुन फिर्यादी यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.167/2021 भादवि कलम 395 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता.
सदर गुन्ह्याचा तपास संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक जामखेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथक करीत होते.गुन्हयाचा शोध करीत असताना पोलीस उपनिरीक्षक थोरात व गुन्हे शोध पथकाचे इतर पोलीस अंमलदार यांना दरोडा टाकणारा लखन भोसले हा त्याचे गावी खांडवी ता.जामखेड येथे आला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यास खांडवी गावात सापळा रचुन ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्याच्याकडुन दरोडा टाकुन लुटलेला मुद्देमाल तपासादरम्यान हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी पोलीसांना चुकवून ब-याच दिवसापासुन फरार होते.पंरतु जामखेड पेालीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास त्यांचा सुगावा लागल्याने अखेर सदर गुन्हयात लखन जिंतुर भोसले रा.खांडवी ता.जामखेड यास अटक करून त्याच्याकडुन 5 तोळे 6 ग्रॅम इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात जामखेड पोलीसांना यश आले असुन सदर गुन्हयात आणखी दोन आरोपी रेखाबाई जिंतुर भोसले व तुकाराम सुर्यभान काळे व इतर 3 जण फरार असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब, मा.अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड , पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलिस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, संदिप राऊत, विजय कोळी, आबा आवारे , अरूण पवार , सचिन देवढे यांनी केली आहे .