जामखेड न्युज——
प्राचार्य श्रीकांत होशिंग हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व – पोपटराव काळे
प्राचार्य श्रीकांत होशिंग यांच्या सेवापुर्ती सोहळ्यात संस्थेने त्यांच्या वर सोपवली विशेष जबाबदारी
तालुक्यातील अनेक परीक्षा, प्रशिक्षणे याचबरोबर वेगवेगळ्या शैक्षणिक कामांसाठी ल. ना. होशिंग विद्यालय हा आधारवड असतो. याच विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व यांच्या कडून खुप शिकण्यासारखे आहे असे मत माजी शिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांनी व्यक्त केले
ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत बाळकृष्ण होशिंग यांचा आज सेवापुर्ती समारंभ एपीजे अब्दुल कलाम सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धव देशमुख, अध्यक्ष दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी प्रमुख पाहुणे अरूण देशमुख, पोलीस निरीक्षक महेश पाटील, माजी शिक्षणाधिकारी पोपटराव काळे, उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक अशोक शिंगवी, सैफुल्ला खान, डिप्लोमा काॅलेज प्राचार्य विकी घायतडक, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, रमेश गुगळे, रमेश अडसुळ, बी. ए. पारखे, दत्ता काळे, दशरथ कोपनर, आप्पा शिरसाठ, श्रीराम मुरूमकर, संगिता देशमुख, नलिनी कुलकर्णी, ज्ञानदेव मुरूमकर, आशिष तागडे, प्राचार्य एम एल. डोंगरे, प्रा. मधुकर राळेभात, सदानंद होशिंग, शिवाजीराव ढाळे, उपप्राचार्य डॉ. सुनील नरके, साधना होशिंग, मीना होशिंग, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, निखिल देशमुख, अमित चिंतामणी, आकाश बाफना, बिभीषण धनवडे, मनोज कुलकर्णी, दिगंबर चव्हाण यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धव देशमुख म्हणाले की, एक विद्यार्थी प्रिय शिक्षक ते प्राचार्य आज सेवानिवृत्त होत आहेत संस्थेला खुप उणीव सहन करावी लागणार आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी संस्था त्यांना संस्थेचे समन्वयक म्हणून नेमत आहे. असे जाहीर केले. त्यांनीही या पदावर काम करण्यासाठी सहमती दर्शवली.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख म्हणाले की, संस्थेने त्यांना प्राचार्य पदी नियुक्त केले या संधीचे त्यांनी सोने केले. आपल्या संपूर्ण सेवेच्या काळात एकाही कर्मचाऱ्याबद्दल तक्रार न करणारा एकमेव प्राचार्य असेल तसेच प्रथम हित विद्यार्थी व शाळेचे पाहणे यामुळे विद्यार्थ्यांच्या आदरास होशिंग साहेब पात्र ठरले आहेत. आज अनेक उच्च पदस्थ विद्यार्थी त्यांचे आहेत.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, प्राचार्य श्रीकांत होशिंग हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व त्याच्या सेवापुर्ती सोहळा त्रिवेणी संगम झालेला आहे. त्यांचे गुरू, सहकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शिक्षकांच्या संस्कारामुळे सुसंस्कृत पिढी निर्माण होते यामुळे आमची जबाबदारी कमी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अरूण देशमुख म्हणाले की, हा सन्मान महागुरूचा सन्मान
आहे. श्रीकांत होशिंग हे गुणी शिक्षक ते प्राचार्य असा कर्तृत्वाचा आलेख उच्च गेलेला आहे.
यावेळी श्रीकांत होशिंग व साधना होशिंग यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, मी व माझा भाऊ अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत घडलो. वडीलांच्या प्रमाणिक सेवेचे हे फळ आहे. शिपायाचा मुलगा प्राचार्य झाला. माझ्या अडचणी च्या काळात मित्रांनी खुप सहकार्य केले. प्रत्येकामध्ये कोणतातरी चांगला गुण असतो तो मी हेरला यामुळे चांगले काम करता आले. आज विविध क्षेत्रातील उच्च पदस्थ विद्यार्थी हिच माझी खरी संपत्ती आहे. आपले कुटुंब ज्याच्यावर चालते त्याला आपण जपले पाहिजे.
यावेळी रमेश चौधरी, सदानंद होशिंग, साधना होशिंग यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
अ. ल. देशमुख यांनी पत्राद्वारे आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले (देशमुख) यांनी प्रस्तावित एस. के.शेख यांनी केलेतर आभार पी. टी. गायकवाड यांनी मानले