खुशखबर खुशखबर खुशखबर बाफना पेट्रोलियम वर सीएनजी गॅस स्टेशन सुरू

0
630

जामखेड न्युज——

खुशखबर खुशखबर खुशखबर

बाफना पेट्रोलियम वर सीएनजी गॅस स्टेशन सुरू

 

जामखेड शहरात पेट्रोलियम मध्ये अग्रगण्य नाव असणाऱ्या बाफना पेट्रोलियम वर आता सीएनजी गॅस स्टेशन सुरू झाले आहे. यामुळे वाहनधारकांची मोठी अडचण दूर झाली आहे. गेल्या वीस वर्षापासून 365 दिवस 24 तास आपल्या सेवेत असणारा बाफना पेट्रोलियम वर आता सीएनजी गॅस स्टेशनचे उद्घाटन झाले आहे.

उद्घाटन प्रसंगी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड cng विभागाचे व्यवस्थापक मनोज सर, पाटील साहेब तसेच बाफना पेट्रोलियमचे संचालक आकाश दिलीप जी बाफना, व्यवस्थापक बाळासाहेब नवसरे, गणेश मोहोळकर,अत्तर शेख , जावेद सय्यद, राम नागरगोजे, सागर वनवे, निलेश घायाळ, निखिल हुलगुंडे, समीर पठाण तसेच बाफना इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक परशुराम भांगे, अशोक कुमटकर, गणेश भवर इतर सर्व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.


CNG गॅस हा एका प्रकारचा नैसर्गिक वायू
CNG गॅस हा एका प्रकारचा नैसर्गिक वायू आहे, याचा उपयोग Petrol, Gas, Diesel किंवा LPG च्या ऐवजी वापरला जाऊ शकतो. CNG पेट्रोल, डिझेल च्या तुलनेत खूप कमी प्रदूषण निर्माण करतो.

CNG ला Ideal Fuel असे म्हणतात कारण हा गॅस जवळपास पूर्णपणे Burn होतो, यातून प्रदूषण करणारे वायू बाहेर पडतात परंतु त्यांचे प्रमाण खूप कमी असते. पेट्रोल व डिझेल च्या ज्वलन प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, आणि नायट्रोजन ऑक्साईड्स वायू उत्सर्जित होतात, जे पर्यावरणासाठी खूप विनाशकारी आहेत.


सीएनजी गॅस खूप जास्त ठिकाणी वापरला जातो, याचे कारण म्हणजे CNG चे फायदे

1) पेट्रोल, डिझेल च्या तुलनेने CNG गॅस स्वस्त मिळतो.

2) पेट्रोल, डिझेल च्या तुलनेत मायलेज जास्त मिळते.

3) या गॅस चे ज्वलन झाल्यावर जे वायू उत्सर्जित होतात ते पर्यावरणाला नुकसान दायक नसतात.

4) सीएनजी वायू चे ज्वलनाचे तापमान जास्त असल्याने वाहनांना आग लागण्याचा धोका कमी होतो.

5) सीएनजी गॅस वापरणाऱ्या इंजिन मधून आवाज कमी येतो त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होते.

सीएनजी हा एक नैसर्गिक वायू आहे. या वायू चा वापर रिक्षा, बस, कार मध्ये इंधन म्हणून केला जातो. वाहनात मागच्या बाजूला एक गॅस च्या टाकी सारखी टाकी असते, त्यात हा CNG गॅस भरलेला असतो व त्याद्वारे वाहन चालवले जाते. सीएनजी गॅस हा पर्यावरणास हानी पोहोचवत नाही, यामुळे सरकार सुद्धा CNG चा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here