Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल 

0
288
जामखेड न्युज – – – 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून नगण्य दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच चांदी झाली आहे. पुण्यातल्या धानोरीत अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. सध्या मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 108 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.
पुणेकरांची चांदी, एका रुपयात 1 लिटर पेट्रोल!
पेट्रोल दरवाढीसाठी केंद्र सरकार कसं जबाबदार आहे, हे वारंवार अजित पवार यांनी दाखवून दिलंय, तशी टीका ते वारंवार करत असतात. राष्ट्रवादीने महागाई विरोधात अनेक वेळा आंदोलनही केलं आहे. आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा- अजित पवार
देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. अनेक जवळची माणसं आपल्याला सोडून जात आहेत. अशावेळी थाटामाटात वाढदिवस साजरा करणं उचित नाही. त्यामुळे यंदा साधेपणाने वाढदिवस साजरा करत कार्यकर्ते, शुभचिंतकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचं आवाहन खुद्द अजित पवार यांनी केलंय.
बीडमध्ये महाआरोग्य शिबीर!
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा करण्याचा संकल्प केलाय. त्यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करत या शिबिराच्या माध्यमातून मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी करण्याचा त्यांचा मानस आहे.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटल आणि स्व. मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट (जालना रोड बीड) येथे मोफत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी या मराठवाडास्तरीय मोफत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन आ. प्रकाश सोळंके यांनी केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!