जामखेड न्युज——
राजुशेठ (गोपीनाथ) देशपांडे यांना उद्योग क्षेत्रातील जेआरडी टाटा उद्योग विकास पुरस्कार
जामखेड, पुणे परिसरातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन
जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील मुळ रहिवाशी व सध्या पुणे येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले राजुशेठ (गोपीनाथ) देशपांडे यांना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग विकास पुरस्कार काल पुणे येथे देण्यात आला. यामुळे त्यांच्या वर जामखेड सह पुणे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजुशेठ देशपांडे हे कल्याणी अर्थमुव्हर्स अँड कंन्ट्रक्शन चे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. काल पुणे येथे अँटो क्रीटल पिंपरी चिंचवड येथील सभागृहात आदर्श गाव हिवरेबाजार चे सरपंच पोपटराव पवार सह रविराज इंगळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पुरस्कार वितरण संपन्न झाला. या पुरस्कारामुळे जामखेड पुणे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या मानाच्या पुरस्काराबद्दल माजी मंत्री विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे, आमदार विलास लांडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ, सचिन गायवळ, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, चेअरमन उद्धव हुलगुंडे यांच्या सह जामखेड, पुणे येथील विविध मान्यवर मित्रमंडळी व नातेवाईक यांनी
अभिनंदन केले आहे.
जेआरडी टाटा उद्योग विकास पुरस्कार हा मानाचा पुरस्कार समजला जातो. सन्मापत्रात म्हटले आहे की, आपण कुठल्याही प्रकारची नोकरी न करता उद्योग व्यवसायाकडे वळलात आपल्या कर्तुत्वाने यशस्वी देखील झालात. आम्हास आपला अभिमान वाटतो. म्हणून आपली या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
२१ व्या शतकातील एक मराठी व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून आपण भारतरत्न जे.आर.डी. टाटा यांच्या विचारांकडे वाटचाल करीत आहात. आपल्या कर्तृत्व शैलीचा गौरव व्हावा म्हणून आपणास मानाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
स्थापनेपासून सातत्याने समाजासाठी व देशासाठी योगदान देणारा टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी आहे.’ असे गौरवोद्गार पोपटराव पवार यांनी काढले. पुण्यातील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभुणे होते.
या कार्यक्रमात राजुशेठ देशपांडे यांना उद्योग क्षेत्रातील जेआरडी टाटा उद्योग विकास पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
सरपंच विमल ठाणगे यांच्या हस्ते वृक्षाला जलार्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. तसेच, पुरस्कारार्थींशी संवाद साधला. बाजीराव सातपुते यांनी ‘टाटांना अभिप्रेत असलेला एकविसाव्या शतकातील उद्योजक’ या विषयावरील व्याख्यानातून जे. आर. डी. टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू मांडले. महेंद्र भारती, सुप्रिया सोळांकुरे, अरुण गराडे, जयवंत भोसले, फुलवती जगताप, राजू जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर वाघोले यांनी आभार मानले.