जामखेड न्युज——
माळी संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी दशरथ हजारे यांची निवड
ज्योती क्रांती सोसायटीचे व्हाईस चेअरमन दशरथ हजारे यांची अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक आघाडी माळी महासंघ पदावर निवड करण्यात आली आहे.
हजारे यांनी सामाजिक कार्यासाठी दिलेले योगदान व सामाजिक कार्याचा दांडगा अनुभवाची दखल घेत माळी महासंघ शाखा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने अहिल्या नगर येथे पार पडलेल्या माळी समाज हक्क परिषदेत निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष माळी महासंघ अविनाश ठाकरे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अरुण विखे, राष्ट्रीय सचिव संतोष जमदाडे, सहकार आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपअध्यक्ष राम पानमळकर, प्राध्यापक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद तांबे, जिल्हाअध्यक्ष दक्षिण अहिल्यानगर भूषण भुजबळ,
जिल्हाअध्यक्ष उत्तर रामनाथ शिंदे, जिल्हाअध्यक्ष महिला आघाडी जयश्री व्यवहारे, ज्योती क्रांती सोसायटीचे संचालक मारुती रोडे, ज्योती क्रांती सोसायटीचे संचालक विष्णु हजारे, रामलिंग हजारे, राजेंद्र हजारे, एकनाथ हजारे, पांडुरंग हजारे, महेंद्र खेत्रे सह नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
माळी समाज हक्क परिषदेत दशरथ हजारे यांची अहिल्यानगर जिल्हाअध्यक्ष जेष्ठ नागरिक आघाडी माळी महासंघ पदी निवड झाल्याने जवळा ग्रामस्थांनी सत्कार करण्यात आला.