जामखेड न्युज——
बिभीषण धनवडे यांच्या वतीने शेकडो महिलांना मोहटादेवीचे दर्शन
एकवीस वर्षापासून जपत आहेत अखंड लोकसेवेचा वसा
गेल्या एकवीस वर्षापासून नवरात्र उत्सवामध्ये जामखेडमधील प्रभाग पंधरा मधील महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडवून आणतात याही वर्षी सुमारे पंचवीस क्रुझर गाड्याचा ताफा सुमारे 250 ते 300 माता भगिनींना घेऊन मोहटादेवी दर्शनाला रवाना झाला यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते.
यावेळी नगरसेवक बिभीषण धनवडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, काकासाहेब कोल्हे, मनोज भोरे, संदीप गायकवाड, सुग्रीव सांगळे, गणेश हागवणे, प्रकाश काळे, उमर कुरेशी, पिंटू इंगोले, अमोल बहिर, विशाल वराट यांच्या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते.
नगरसेवक बिभीषण धनवडे हे नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस वेगवेगळे उपक्रम राबवतात यातील एक दिवस प्रभागातील महिलांना घेऊन मोहटादेवीचे दर्शन घडवितात आज सकाळी सुमारे 250 ते 300 माता भगिनींना घेत दहा वाजता पंचायत समिती समोरून पंचवीस क्रुझर गाड्याचा ताफा रवाना झाला. यावेळी माता भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
सदाफुले वस्तीवर बिभीषण धनवडे यांच्या वतीने जगदंबा देवीचे मंदीर उभारणीचे काम सुरू आहे. लवकरच तेही काम पूर्ण होईल असे धनवडे यांनी सांगितले.
बिभीषण धनवडे यांनी नुकताच भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपला उपक्रम सुरू ठेवला आहे.
बिभीषण धनवडे हे दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. जगदंबा महीला मंडळासह सर्वाना वर्षभर देवीची सेवा करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे बांधकाम सुरू आहे लवकरच बांधकाम पूर्ण होईल.असे धनवडे यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवेचा वसा अखंड सुरू ठेवणार आहे.