जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
साकत परिसरातील व्हिक्ट्रीविंड फार्म सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पवनचक्की कंन्ट्रोल रूममधून आठ लाख रुपयांची केबल व सीटी मोड्युल्स चोरी झाले होते तशी फिर्याद भुषण युवराज मांडेवाड (वय -34 वर्ष) धंदा-नोकरी, ज्युनियर इंजिनियर यांनी दिली यानुसार जामखेड पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत बारा तासात मुद्देमालासह चार आरोपींना अटक केली आहे. यामुळे जामखेड पोलीसांच्या तत्पर कामगिरीमुळे पोलीसांचे अभिनंदन होत आहे.
साकत परिसरातील व्हिक्ट्रीविंड फार्म सर्विसेस प्रा.लि. पवनचक्की कंन्ट्रोल रूममधून दिनांक ७ जुलै ते ९ जुलैच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता वेगवेगळया कंपनीच्या केबल्स ४,१०,२२५ रुपये व सीटी मोड्युल ३,९७ ,३०० रूपये असा एकुण ८,०७,५५० रुपये किंमतीचा माल चोरून नेला या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१ ३३०/२०२१ भादवि कलम ३८०, ४२७ प्रमाणे दिनांक १८ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच जामखेड पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या बारा तासात चोरट्यांला जेरबंद करत चोरीचा काही माल हस्तगत केला आहे. पोलीसांच्या तत्पर कामगिरीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथक करीत होते. गुन्हयाचा शोध करीत असताना पोलीस उपनिरीक्षक थोरात व गुन्हे शोध पथकाने चोरी करणा-या टोळीची खात्रीलायक बातमी मिळाली की,सदर घडलेला गुन्हा 1) महेंद्र विष्णु पवार वय-23 वर्ष त्याचे घरी जावुन घरझडती घेतली असता त्याचे घरातुन 35 किलो सोललेल्या केबलमधील तांब्याची तार किंमत अंदाजे 35 हजार मिळुन आली त्याच्याकडे तेथेच चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल करून इतर आरेापीची नावे , 2) बालाजी बापु काळे वय-21 वर्ष , 3)रमेश अशोक शिंदे वय -38 वर्ष ,4)उमेश बलभिम काळे वय-21 वर्ष सर्व रा.आरोळे वस्ती,जामखेड ता.जामखेड जि. नगर असे सांगितले. सदर आरोपी यांच्यावर सापळा रचुन त्यांना पकडण्यात गुन्हे शोध पथक जामखेड यांना यश आले. सर्व आरोपींना ताब्यात घेवुन तपासादरम्यान सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली व गुन्हयात चोरीस गेलेला इतर मुद्देमालापैकी 66 हजार रूपये किंमतीचे तांब्याची तार काढुन घेतली सदर आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
सदरचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक करण्यास व मुद्देमाल हस्तगत करण्यास जामखेड पोलीसांना यश आले आहे.मुख्य आरोपी बालाजी ऊर्फ दादा बापु काळे वय-21 वर्ष रा.आरोळे वस्ती ,जामखेड ता.जामखेड याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.तसेच त्यांनी आणखी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता नाकारता येत नसुन अधिक तपास पोलीस करत आहोत.
1) भुम पोलीस स्टेशन जि. धाराशिव गु.र.नं.I 79/2016 भादवि कलम 457 ,380,411
2) भुम पोलीस स्टेशन जि.धाराशिव गु.र.नं.I 81/2016 भादवि कलम 457 ,380
3) जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं.I 175/2017 भादवि कलम 454 ,457,380
4) जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. I 21/2014 भादवि कलम 376 ,506
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांच्या
मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, पोलिस कॉन्स्टेबलअविनाश ढेरे, संग्राम जाधव संदिप राऊत, विजय कोळी, आबा आवारे, अरूण पवार सचिन देवढे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात करत आहेत.