जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
गेल्या एक महिन्यापासून पेट्रोल व डिझेलच्या भावात वाढ होत आहे. या इंधन दरवाढीच्या विरोधात जामखेड येथे
मोटारसायकलची अंत्ययात्रा खर्डा चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत काढून कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधकांकडून दररोज आंदोलन केले जात आहे. तिरडीवर मोटारसायकल ठेवून त्याला पुष्पहार घालून त्या मोटारसायकलची प्रतीकात्मक अंत्ययात्रा तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
२०१४ मध्ये विविध जाहिराती व लोकप्रिय घोषणा देत मोदी सरकारने सत्ता मिळविली. मात्र, अद्याप, जनतेला ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. जनतेच्या आशेवर भाजपने पाणी फिरविले असून, सहा वर्षांत नोटबंदी, जीएसटी यांसारखे जनसामान्यांविरोधी निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी तसेच बेरोजगारी निर्मुलनात व महागाई कमी करण्यात केंद्रातील सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. आंदोलनात
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात, वंचीत बहुजन आघाडीचे नेते ॲड. अरुण जाधव, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष कुंडल राळेभात, नगरसेवक अमित जाधव, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे, अमित गंभीर, वंचीत आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिष पारवे, अरूण डोळस, विनोद टकले, रोहित ससाणे, किरण जावळे, प्रल्हाद गिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना निवेदन देण्यात आले.




