जनतेच्या विश्वासामुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार – आमदार रोहित पवार मंत्री असताना पराभव केला आता तर ते फक्त आमदार

0
656

जामखेड न्युज———

जनतेच्या विश्वासामुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार – आमदार रोहित पवार

मंत्री असताना पराभव केला आता तर ते फक्त आमदार

 

कर्जत जामखेड मतदारसंघात मोठय़ा लोकांचे लक्ष लागले आहे. पण मी पाच वर्षांपासून लोकात आहे जनतेचे माझ्यावर प्रेम आहे. आता काही लोक निवडणूका आल्या की लोकात जात आहे. 2019 ला कर्जत जामखेड मधील जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड मतांनी निवडून दिले त्यावेळी ते कॅबिनेट मंत्री होते आता तर ते आमदार आहेत. आता आम्हाला विजय मिळवयाचा नाही तर लिड वाढवयाचे आहे. हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम आहे असा विश्वास आ. रोहीत पवार यांनी व्यक्त केला. आ. रोहीत पवार यांचा जामखेड तालुक्यातील घुलेवाडी येथे बुधवारी जनतेशी संवाद दौरा चालू असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बदलापूर घटनेबाबत बोलताना आ. पवार म्हणाले, बदलापूर येथील शाळेतील लहान विद्यार्थीनीवर झालेला अत्याचाराची घटना काळीमा फासणारी आहे. सदर घटनेतील आरोपीला फाशी दिली पाहिजे होते.

पण आता ती शिक्षा अप्रत्यक्षपणे दिलीच आहे. याबाबत काही चुकीच्या गोष्टी झाल्या असेल तर तो विषय कोर्टात गेला आहे. या विषयाच्या आणखी खोलात जावे लागेल यामध्ये काही षडयंत्र आहे का? संस्था चालक व या षडयंत्राचे काय संबध आहे का हा फार मोठा विषय आहे.

 

राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र राम शिंदे मंत्री असताना त्यांना ते थांबवता आले नाही ते दुसऱ्या जिल्ह्य़ात गेले होते. आमचे सरकार आल्यावर ते केंद्र ओढून आणले.

मंजुर केले त्याचे भूमिपूजन केले निधी आणला सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. भरती झाली दोन वर्षांपूर्वी आलेल्या सरकारने निधी रेंगाळला त्यामुळे थोडे काम अपूर्ण आहे. उद्या गुरवारी 26 रोजी त्याचे उद्घाटन माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री अनिल परब यांच्या हस्ते होत आहे .

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जामखेड मधील राष्ट्रवादी नेत्यांच्या झालेल्या प्रवेशा बद्दल बोलताना आ. पवार म्हणाले, राज्यात बातमी व्हावी म्हणून काही जणांचे प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.

ते राज्यात बातमी व्हावी म्हणून झाले. फडणवीस हे ज्यावेळी महिलावर अत्याचार होतात, शेतकरी अडचणीत आला, युवा वर्ग अडचणीत आहे. त्यावेळी फडणवीस वेळ देत नाही पण प्रवेशाला वेळ देतात यावरून कर्जत जामखेडचे वजन महाराष्ट्रात वाढले आहे.

दि. 28 रोजी खर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत आहे त्यावेळी अनेक जणांचा प्रवेश होणार आहे. राज्यात बातमी व्हावी म्हणून किंवा हवा व्हावी म्हणून आमचे प्रवेश नाही असा टोला आ. पवार यांनी प्रा. मधुकर राळेभात व शिवसेना नेत्यांच्या प्रवेशावर केला.

शरद पवार हे दैवत आहे असे विधान अजित पवार यांनी केले आहे याबाबत बोलताना आ. पवार म्हणाले हे स्टेटमेंट होते ती राजकीय रणनीती नव्हती ते स्टेटमेंट भावनिक होते. त्याला राजकारणाला जोडू नये. जे राजकीय पॉलीसी असतात ते अशीच कोणीच बोलात नसतात मनामध्ये बरेच काही असते. पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते भाजपचे जे दिल्लीचे नेते आहेत त्यांना कळणार सुध्दा नाही या विधानसभेला काय होणार याची प्रचिती त्यांना लोकसभेला आली आहे. विधानसभा निवडणुकीत लोकसभा पेक्षा गंभीर परिस्थिती महायुतीवर येईल असा आशावाद आ. रोहीत पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here