फसवणूक प्रकरणातील आरोपीस अटक करण्यास जामखेड पोलीसांची टाळाटाळ कदम कुटुंबीयाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू

0
1967

जामखेड न्युज——

फसवणूक प्रकरणातील आरोपीस अटक करण्यास जामखेड पोलीसांची टाळाटाळ

कदम कुटुंबीयाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू

 

जामखेड पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा 25-06-2024 रोजी दाखल झालेला आहे. आरोपींचा अटकपूर्व जामीन श्रीगोंदा सेशन् कोर्टाने फेटाळला आहे. परंतु आरोपी आण्णा ऊर्फ श्रीकृष्ण आदिनाथ सावंत याला अटक झालेली नाही. सदर आरोपी मोकाट फिरत आहे या आरोपी कडून कदम कुटुंबीयांच्या जिवितास धोका आहे. आरोपी वारंवार धमकी देतो. गुन्हा दाखल होवून तीन महिने झाले तरी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे गुन्हेगारास वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. लवकरात लवकरआरोपीला अटक करावी म्हणून कदम कुटुंबीयानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे.

याबाबत माहिती अशी की,जामखेड येथील सौरव कदम यांच्याकडून नोकरी लावण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन अण्णा सावंत यांने फसवणूक केली होती. झालेल्या फसवणुकीचा जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात होती. यासाठी कदम कुटुंबाला सावंत याच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर कुटुंबासहित उपोषणास बसावे लागले होते.

याची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अण्णा सावंत याच्यावर 25 जून 2024 रोजी गुन्हा फसवणुकीचा दाखल झाला होता. सदर आरोपीने अटकपूर्व जामीन साठी श्रीगोंदा न्यायालयात धाव घेतली होती परंतु श्रीगोंदा सेशन कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला आहे. अण्णा सावंत हा आरोपी मोकाट फिरत आहे, गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले तरीही जामखेड पोलिसांना आरोपी पकडण्यास अपयश आले आहे.

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप फिर्यादी सौरव कदम व त्याच्या कुटुंबाने जिल्हाधिकारी यांना दिलेला निवेदनात केला आहे.

 

आरोपी अण्णा सावंत यांच्याकडून आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
याबाबत दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी फिर्यादी सौरव कदम, विठ्ठल किसन कदम, अलका नामदेव शिंदे सर्व राहणार जामखेड हे कुटुंबा सहित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत.

यासंदर्भात फसवणूक प्रकरणातील मोकाट आरोपी अण्णा सावंत याच्या जामखेड पोलीस मुसक्या केव्हा आवळणार याकडे जामखेड करांचे लक्ष लागले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here