Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या ३०० व्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौंडीत आणणार केला...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या ३०० व्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौंडीत आणणार केला – राज्यपाल सी. एच. विजयशंकर

0
676

जामखेड न्युज——

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या ३०० व्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौंडीत आणणार केला – राज्यपाल सी. एच. विजयशंकर

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या ३०० व्या जयंती दिनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना चौंडीला आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत मेघालय चे राज्यपाल सी पी विजयशंकर यांनी चौंडीतील विकासकामांना निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

मेघालय चे राज्यपाल राज्यपाल सी. एच. विजयशंकर यांनी बुधवारी (ता.१८) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव चौंडीला भेट देवुन, अहिल्यादेवींचे दर्शन घेतले. यावेळी अहिल्या स्मारक , जन्मघर गढी, अहिल्या शिल्पसृष्टी व किर्तीस्तंभाची पाहणी करत,माहिती जाणून घेतली. यावेळी विश्रामगृह मैदानात झालेल्या जाहिर कार्यक्रमात राज्यपाल विजयशंकर बोलत होते.यावेळी जेष्ठ नेते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार प्रा राम शिंदे, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील,तहसीलदार गणेश माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उपअभियंता शशिकांत सुतार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक शशिकांत वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, कर्जतचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपा विधानसभा प्रमुख प्रवीण घुले, माजी सभापती डाॅ.भगवान मुरूमकर, रवी सुरवसे, बाजीराव गोपाळघरे, शांतीलाल कोपनर,शेखर खरमारे, गणेश पालवे, प्रशांत शिंदे ,पांडुरंग उबाळे , डाॅ.ज्ञानेश्वर झेंडे, लहु शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

राज्यपाल विजयशंकर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव चौंडी हे केवळ जन्मभूमीच नाही, तर चौंडी श्रीक्षेत्र तपोभूमी आहे, त्यागाची भूमी आहे. आदर्शभूमी आहे. अहिल्यादेवींची शक्ती शाश्वत आहे. ती शक्ती आम्हाला कायम प्रेरणा देते. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल विजयशंकर म्हणाले, देश,धर्म रक्षणाचा विषय येतो.त्यावेळी महाराष्ट्रातील जनता कधी मागे हटत नाही. भारतात सनातन धर्म रक्षणासाठी दोन शक्तींची नावे प्रकर्षाने पुढे येतात.त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घ्यावे लागेल.

 

धनगर समाजाबद्दल बोलताना राज्यपाल विजयशंकर म्हणाले, धनगर समाजाने कधीच कोणाचा विश्वासघात केलेला नाही. हा समाज कायम प्रामाणिक राहिलेला आहे. ही धनगस समाजाची परंपरा आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हा समाज वेगवेगळया नावाने ओळखला जातो. मात्र संस्कृती एकच असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल विजयशंकर म्हणाले, राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर केवळ राजभवनात बसून न राहता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी महिण्यातील २० दिवस मेघालयासाठी दिले तर १० दिवस देशभर फिरण्यासाठी दिले. लोकांमध्ये गेल्याशिवाय त्यांच्या समस्या कशा समजणार ? असा सवाल करत सरकारकडून लोकांना काय अपेक्षा आहेत .हे त्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतरच कळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार राम शिंदे यांचेही भाषण झाले.आमदार शिंदे यांनी राज्यपाल विजयशंकर यांचा अहिल्या मुर्ती, गोंघडी , काठी देवुन सत्कार केला.

महाराष्ट्रातील धनगर समाज संस्कृतीला महत्व देवून दौरा करणारे देशातील पहिले राज्यपाल सी. एच. विजयशंकर ठरले आहेत. राज्यपाल विजयशंकर यांनी चौंडीला येण्यापुर्वी पट्टणकोडोलीचे विठ्ठल बिरूदेव, आरेवाडीचे श्री बिरोबा , आदमापुरचे श्री बाळुमामा तिर्थस्थळांना भेटी दिल्या आहेत. आज चौंडीला भेट दिल्यानंतर १९ सप्टेबर रोजी ते अमरावतीत मेंढपाळांना भेटून,त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!