जामखेड न्युज——
जामखेड शहरातील बड्या बिल्डर्स कडून गोरगरिबांची जमीन गिळंकृत करण्याचा डाव मुख्याधिकारी यांच्या कडे तक्रार

जामखेड शहरातील बड्या बिल्डर्स कडून अनेक वेळा आमची शेतजमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अशी तक्रार मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात जहाँअरा जाहेरखान पठाण, मुदस्सरखान जाहेरखान पठाण, जमिरखान जाहेरखान पठाण यांनी तक्रार केली आहे.

मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड नगर परिषदेने दिनांक १९/०१/२०२४ रोजी प्रारूप विकास योजनेचा नकाशा प्रसिद्ध केला असुन त्यामध्ये आमचे वडीलो पार्जीत मालकीच्या जामखेड येथील गट नं १०६०/१ मधील शेतजमीनी मध्ये १२ मीटर रुंदीचा प्रस्तावित मंजुरीसाठी दर्शविलेल्या आहे. त्यामुळे आमच्या मिळकतीतील २० ते २२ गुंठे क्षेत्र रस्त्यामध्ये जाणार असून आमच्यावरअन्याय होत आहे.

सदर मिळकती ही वडिलोपार्जित मिळकत असून मी व माझेकुटुंबातील इतर सदस्य सदर शेत जमिनीचे वहिवाट दार आहेत. सदर शेत जमीन माझी व माझ्या उपजीविकेने साधन आहे. सदरचा प्रस्तावित रस्ता हा अयोग्य असून सदर रस्त्याची मला कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही तसेच या रस्त्याची इतरांना सुध्दा आवशकता नाही.

गट क्रमांक १०६०/१ मध्ये एच.यु. डेव्हलपर्स तर्फे भागीदार दिलीप हरकचंद गुगळे, संतोष पोपटालाल फिरोदिया व विशाल उर्फ सौरभ नामदेव शिंदे यांची १३ एकर ५ गुंठे क्षेत्र खरेदी घेतलेले असून जामखेड नगर रोडच्या लगत माझी मिळकत क्षेत्र ३ हेक्टर २७ आर उपरोक्त व्यक्तीनी माझ्यावर व माझ्या कुटुंबीयांवर अनेक प्रकारे दबाव टाकून माझी मिळकत गिळकृत करण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला आहे.

उपरोक्त व्यक्तींनी राजकीय हेतूने तसेच राजकीय संगनमत करून सदरचा रस्ता त्यांना त्यांचे जागेत प्लॉटिंग व्यवसाय करण्याच्या उद्देशाने राजकीय हस्तक्षेपा मार्फत मंजूर करण्याचा प्रयत्न केलाअसून मला व माझ्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा उद्देशाने सदरचा प्रयत्न प्रारूप रस्ता आराखड्यात मंजूर करून घेतला आहे. सदरचा रस्ता हा एच.यु. डेव्हलपर्स यांचे जमिनीस जास्तीचा भाव यावा व त्यांना फायदा व्हावा या उद्देशाने प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला आहे. सदर जमिनीमध्ये मी व माझे कुटुंबीय शेती करत असून सदर जागेत तूर, हरभरा, ज्वारी इत्यादी पिके घेत असतो. सदर जागेतून रस्ता झाल्यास माझे शेतीस बाधा होईल. सदर जागेतून जाणारा प्रस्तावित रस्ता हा कर्जतच्या मुख्य रस्त्यालगत नसून अंतर्गत रस्त्यास बळजबरीने जोडून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी सदरचा रस्ता बसवण्यात आलेला आहे.

कर्जत-नगर रस्त्यास जोडणारा रस्ता हा माझ्या मिळकतीचे पश्चिमेस अस्तित्वात असताना हा आणखी एक नवीन प्रस्तावित रस्ता बनवण्याचा अट्टाहास केला जात आहे व जाणीवपूर्वक मला व माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे.तरी नियोजन समितीस विनंती की, प्रारूप नकाशातील गट नंबर १०६० / १ मधील प्रस्तावित रस्ता हा माझ्या मिळकतीतून वगळण्यात यावा. अशी विनंती करण्यात आली आहे.









