सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त साकत येथे वृक्षारोपण

0
1176

जामखेड न्युज——-

सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त साकत येथे वृक्षारोपण

जिल्हा बँकेचे संचालक सहकार महर्षी जगन्नाथ (तात्या) राळेभात यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त साकत येथे वड, पिंपळ, चिंच, जांभूळ अशा विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांच्या रूपाने त्यांच्या स्मृती जतन करण्यात आल्या यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

 

साकत येथे जगन्नाथ राळेभात यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त 51 झाडांची लागवड करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक सुधीर राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, संचालक गजानन शिंदे, वृक्ष मित्र रामभाऊ मुरूमकर, साकत सेवा संस्थेचे संचालक पोपट वराट, महादेव वराट, युवराज वराट, दादासाहेब लहाने, पांडुरंग सानप, कृष्णा पुलवळे, दिलीप घोलप, विनोद मुरूमकर, नागराज मुरूमकर, विष्णू लहाने, साकत सेवा संस्थेचे सचिव दादा मेंढकर, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, पत्रकार बाळासाहेब वराट, मनोज मुरूमकर, दिलीप मुरूमकर, गणेश सानप, केशव वराट, तुकाराम वराट, बाळासाहेब मुरूमकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

बिघडत चाललेल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड हा महत्वाचा भाग आहे. यामुळे साकत येथे जगन्नाथ राळेभात यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त वड, पिंपळ, चिंच, जांभूळ अशा 51 झाडांची लागवड करण्यात आली.

 

जगन्नाथ राळेभात म्हणजे सहकारातील धुरंधर, मुत्सद्दी, खमका व नीडर तसेच संवेदनशील नेता म्हणून जगन्नाथ तात्या कडे पाहिले जात होते. झाडांच्या रूपाने त्यांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत.

चौकट
साकत येथील वृक्ष मित्र रामभाऊ मुरूमकर गावात वृक्षलागवड करून स्मशानभूमीचा कायापालट केलेला आहे. जगन्नाथ राळेभात यांच्या प्रेमापोटी त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त गावात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here