जामखेड न्युज——
जामखेड मध्ये शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी व युवती काँग्रेसच्या वतीने भव्य स्वाक्षरी अभियान संपन्न
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जामखेड आयोजित स्वाक्षरी अभियान विविध कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ भव्य स्वाक्षरी अभियान जामखेड मध्ये संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांसाठी लाडकी बहिण योजना, मोफत ३ गॅस सिलिंडर प्रति वर्ष, युवकांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि ₹१०,००० भत्ता, महिलांसाठी मोफत शिक्षण, तसेच शेतकऱ्यांसाठी मोफत वीज या योजनांच्या समर्थनार्थ राज्यभरात स्वाक्षरी अभियान आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे पक्षाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचे प्रतिपादन युवती प्रदेशाध्यक्ष कु.संध्या सोनवणे यांनी केले.
स्वाक्षरी अभियान मध्ये महिलांची भव्य उपस्थिती दिसून आली. या कार्यक्रमादरम्यान महिलांना विविध योजनांची सखोल माहिती देण्यात आली. लाडकी बहिण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. योजनेच्या अंतर्गत महिलांना वर्षाकाठी ३ मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या घरगुती खर्चात मोठी बचत होईल. याशिवाय, महिलांना मोफत शिक्षण देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे, ज्यामुळे अधिकाधिक महिला शिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनतील.
युवकांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण आणि ₹१०,००० चा भत्ता ही योजना अत्यंत क्रांतिकारी ठरली आहे. युवकांना या योजनेमुळे नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊन रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. या योजनांमुळे राज्यातील युवकांना आर्थिक आणि व्यावसायिक आधार मिळणार आहे, जे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना ही देखील अत्यंत मोलाची ठरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनात अधिक नफा मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे आर्थिक स्थिती सुधारेल.
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जामखेड आयोजित स्वाक्षरी अभियानच्या निम्मिताने या सर्व योजनांच्या लाभांविषयी महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांनी योजनेच्या फायद्यांविषयी जाणून घेतले आणि या योजनेचा लाभ घेण्याचा निश्चय केला. कार्यक्रमादरम्यान अनेक महिलांनी आपले अनुभव आणि विचार व्यक्त केले, ज्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कल्याणकारी उपक्रमांचे मनःपूर्वक स्वागत केले.
या स्वाक्षरी अभियान मध्ये राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कु. संध्या सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी महिलांना योजनेबद्दल अधिक जागरूक करण्याचे कार्य केले. हा उपक्रम महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विशेषतः उपयुक्त ठरल्याचे मत सर्व स्तरांवरून व्यक्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्त्व हे नेहमीच सामाजिक न्याय आणि सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने कार्यरत राहिले आहे. या योजनांच्या माध्यमातून पक्षाने महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. पक्षाच्या या उपक्रमामुळे महिलांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एक नवी दिशा मिळणार आहे, तर शेतकरी आणि युवकांसाठी हे एक नवे भविष्य निर्माण करणारे पाऊल आहे.
या स्वाक्षरी अभियान मध्ये राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कु. संध्या सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, तालुकाउपाध्यक्ष बापुराव शिंदे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष रूषी कुंजीर, नगरसेवक आंधळेताई, सोमनाथ राऊत, विकास वराट, विकास राऊत, शोभा वराट, पिंटाबाई मोळकर, आरती राळेभात सह महिला भगिनी युवती युवक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जामखेड आयोजित स्वाक्षरी अभियान कार्यक्रम मध्ये उपस्थिति होते