सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या प्रयत्नामुळे मुक्त संचार करणारा कोल्हा वनविभागाच्या ताब्यात

0
670

जामखेड न्युज——–

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या प्रयत्नामुळे मुक्त संचार करणारा कोल्हा वनविभागाच्या ताब्यात

 

जामखेड शहर परिसरात एक वन्य प्राणी फिरत आहे. यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. काही लोकांच्या मते हा प्राणी पिसाळलेला आहे. यामुळे लहान मुलांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या प्रयत्नामुळे मुक्त संचार करणाऱ्या कोल्ह्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यास यश मिळाले आहे.

दोन दिवसापासून जामखेड शहरात एक कोल्हा हा प्राणी फिरत होता त्याच्या गळ्यामध्ये साखळदंड बांधले होते. संजय कोठारी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहनराव शेळके यांना माहिती दिली होती त्यांचे अधिकारी वनपाल प्रवीण उबाळे, वनरक्षक शांतीलाल सपकाळ, वनसेवक शामराव डोंगरे यांनी प्रयत्न केला.

पहिल्या दिवशी तो सापडला नाही दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता संजय कोठारी यांना एक फोन आला त्या फोन द्वारे कोल्हा सापडलां आहे तुम्ही लवकर या कोठारी यांनी आपले सहकारी सचिन खामकर यांना सोबत घेऊन गेले.

संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले तेथून त्याला स्वतः पकडून आपल्या रुग्णवाहिकेत आणले आणि वनरक्षक शामराव डोंगरे यांच्या ताब्यात दिले आहे.

कोल्हा पकडण्याच्या कामी प्रमोद टेकाळे, दीपक ददियाल, अल्फाज शेख, भाऊसाहेब भोगल, अभिजीत कापसे ,अनिश टेलर ,सुभान शेख आदींनी मदत केली.

आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी बरेच पक्षी, प्राणी जखमी अवस्थेत पकडून पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या मदतीने त्यांच्यावर उपचार करून वन अधिकाऱ्याच्या साह्याने जंगलात सोडण्यात आलेले आहेत संजय कोठारी हे नुसते माणसं वाचवत नाही तर जखमी प्राण्यांना सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

माणसाचे देवदूत नाहीत प्राण्यांचे पण देवदूत झाले आहेत आतापर्यंत जखमी अवस्थेत असलेले मोर, हरीण, काळविट, घुबड, सायाळ, कासव, मांडूळ इत्यादी प्राणी व पक्षी धरून वनविभागाच्या ताब्यात दिलेले आहेत त्यामुळे मानवाला मदत करण्याबरोबरच प्राणी व पक्षी यांना मदत करण्यात संजय कोठारी अग्रेसर आहेत. माणुसकीच्या नात्याने संजय कोठारी हे केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांचीही सेवा करण्यात पुढे असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here