अभियंता संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल माने तर ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी युवराज पाटील यांची निवड

0
275

जामखेड न्युज——

अभियंता संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल माने तर ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी युवराज पाटील यांची निवड

 

अहमदनगर जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी जामखेड पंचायत समितीचे पाणीपुरवठा उपअभियंता विठ्ठल माने यांची एकमताने निवड झाली आहे. तर अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी युवराज पाटील यांची एकमताने निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई १३६ जिल्हाशाखा अहमदनगर च्या “जिल्हाध्यक्ष ” पदी युवराज पाटील ढेरे यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

युवराज पाटील यांच्या बद्दल माहिती

आगोदर युवराज ढेरे पाटील ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाकार्याध्यपदी कार्यरत होते. त्यांच्या सर्व समावेश कार्यामुळे त्यांच्यावर ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. युवराज पाटील सध्या जामखेड तालुक्यात ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते ग्रामसेवक युनियन मध्ये कार्यरत आहेत.

युवराज पाटील यांचे उत्तम संघटन कौशल्य असल्यामुळे नेहमीच ग्रामसेवकांच्या न्याय मागण्यासाठी ते अग्रेसर असतात. यामुळे त्यांच्या वर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. याबद्दल त्यांच्या वर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विठ्ठल माने अभियंता जिल्हाध्यक्ष बद्दल माहिती

 

तर अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष उपअभियंता विठ्ठल माने हे सध्या पाणीपुरवठा उपविभाग जामखेड आणि कर्जत येथे उपअभियंता पदावर कार्यरत आहेत. याबरोबरच इतरही पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा कार्यकारिणीत निवड करण्यात आल्या आहेत. यामधे मयूर मुनोत यांची कार्याध्यक्ष, हर्षल काकडे यांची उपाध्यक्षपदी, अशोक पाटील यांची खजिनदारपदी तर किरण साळवे सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

उपअभियंता असलेले विठ्ठल माने हे सन १९९९ मध्ये शासकीय सेवेत कनिष्ठ अभियंता म्हणून जिल्हा परिषद अहमदनगरच्या पाणी पुरवठा विभागात पदभार घेतला. त्यांचे मूळ गाव नगर तालुक्यातील भाबुर्डी घुमट असून शालेय शिक्षण गावी व शेजारील वाळकी गावी झाले.अभियांत्रिकी शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. ग्रामीण भागाची लहानपणापासून कळकळ असल्यामुळे नोकरीमध्ये जलसंधारण, पाणी पुरवठा, मूलभूत ग्रामीण सुविधा इ.क्षेत्रात झोकून देऊन काम केले. आत्तापर्यंत त्यांनी श्रीरामपूर, कोपरगाव, कर्जत व जामखेड या तालुक्यात सेवा केलेली आहे. तालुक्यातील सामान्य नागरिक, लोक प्रतिनिधी, कार्यालयीन सहकारी, वरीष्ठ या सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.

अहमदनगर जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या माध्यमातून अभियंता, कर्मचारी यांचे ज्वलंत प्रश्न सोडविणे, निर्भयपणे मोकळ्या वातावरणा मध्ये काम करण्यासाठी तसेच काम करण्याची क्षमता वाढविणेसाठी त्यांना प्रोत्साहन देणे आदी कार्य करण्याची आवड आहे. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षपदी निवड झालेबद्दल विठ्ठल माने यांचे अभिनंदन अहमदनगर जिल्ह्यातील खासदार, आमदार व सर्व जिल्हा परिषद सदस्य, जिल्हायातील सर्व शासकीय अधिकारी व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकार बांधवासह सर्वानी विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here