जामखेड न्युज——
विद्यार्थीप्रिय शिक्षक बाळू जरांडे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार
शाळेच्या शैक्षणिक व विविध उपक्रमामुळे बाळु गंगाराम जरांडे उपा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवार वस्ती (पाडळी) यांना यावर्षीचा सन 2024 चा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षक बाळु गंगाराम जरांडे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवस्ती (पाडळी), केंद्र – नान्नज, ता.जामखेड जि. अहमदनगर येथे सन 2018-19 पासूनकार्यरत आहेत. त्यावेळी शाळेचा पट 10 होता. बाळु जरांडे सर हे यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शने व सरावाने आज शाळेचा पट 35 केला आहे. शाळेमध्ये दरवर्षी 100% विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थी बसवले जातात.
स्पर्धा परीक्षांमध्ये 2 विद्यार्थींची नवोदय विद्यालय येथे निवड झाली असून एका विद्यार्थ्याची सैनिक स्कुल मध्ये निवड झाली आहे. पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती 5 वी मध्ये 4 विद्यार्थींची जिल्हास्तरीय यादीत निवड झाली आहे. मिशन आरंभ जिल्हा स्तरावर 1 विद्यार्थ्याची निवड तर तालुका स्तरावर 3 विद्यार्थींची निवड झाली आहे. दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षेला शाळेतील मुले बसवली जातात. आतापर्यंत दरवर्षी शाळेतील अनेक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादी चमकली आहेत.
शाळेमध्ये विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, नवोदय या परीक्षांचे मार्गदर्शन सातत्याने केले जाते. शाळेचा निकाल दरवर्षी 100% लागतो. शालेय परिसरामध्ये वृक्ष संवर्धन केलेले असून शालेय परिसर हिरवागार आहे. तसेच आतापर्यंत 1 लाख 50 हजार एवढा लोकसहभाग जमा केला आहे. तसेच लोक सहभागातून शालेय रंगरंगोटी व वृक्ष संवर्धनासाठी निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे बंद पडू लागलेली शाळा पुन्हा एकदा नवीन जोमाने सुरू झाली.
या विविध उपक्रमामुळे बाळु गंगाराम जरांडे उपा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवस्ती (पाडळी) यांना यावर्षीचा सन 2024 चा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे पुणे महानगर पालिकेचे माजी शिक्षण अधिकारी काळे साहेब, बीड माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे , गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, केंद्रप्रमुख त्र्यंबके,राम निकम सर, केशव गायकवाड, सुरेश मोहिते, केंद्रप्रमुख सुरेश कुंभार,
आदर्श शिक्षक एकनाथ (दादा ) चव्हाण, पांडुरंग मोहळकर, विश्वस्त मुकूंद सातपुते सर, चेअरमन संतोष राऊत, माजी चेअरमन नारायण राऊत, किसनराव वराट, घोडके सर, कुमटकर सर, कोळेकर सर , कुंभार सर, पारखे सर , बहीर सर यांच्यासह जामखेड तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षिका व सरपंच ग्रा. प. सदस्य ग्रामस्थ पवार वस्ती (पाडळी ) यांनी अभिनंदन केले.