जामखेड न्युज——
मी स्वाभीमानी, कोणोपुढे झुकत नाही, झुकणार नाही – आमदार रोहित पवार
समोर कोणीही असले तरी कर्जत जामखेड मधुनच लढणार
” कोणा कोणाशी लढतोय ; ते तुम्ही बघताय ऐकताय. तुम्ही मला लढायला शिकवलं. येत्या काळात विचारांच्या लढ्यासाठी मी भल्ला भल्ल्यां बरोबर भिडायला तयार आहे. स्वाभिमानी मराठी माणसं आहोत; कोणोपुढे झुकत नाहीत ; अशा शब्दांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पूत्र जय पवार यांच्या उमेदवारा संदर्भात सुरू असलेल्या चर्चेची हवा काढून घेतली. सरपंच घोटाळे काहींनी सांगितले. मात्र येथे नेते घोटाळे आहेत. आगामी काळात अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर निघणार आहेत ; अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला.
निमित्त होते जामखेड येथील ‘दहीहंडी उत्सवा’ चे ; यावेळी सिनेतारका सोनाली कुलकर्णी आणि मराठी मालिका फेम ऋता दुर्गुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार मा रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून नागेश विद्यालय जामखेड येथे भव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित कार्यसम्राट आमदार मा श्री रोहित दादा पवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जेष्ठ नेते राजेंद्र कोठारी, दत्ताभाऊ वारे, माजी सभापती सूर्यकांत नाना मोरे, माजी सभापती संजय वराट सर, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, महीला तालुकाध्यक्षा सौ राजश्रीताई मोरे,ओबीसी तालुकाध्यक्ष विश्वनाथ राऊत, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, साकतचे सरपंच हनुमंत पाटील,
कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात, शहराध्यक्ष वसीम सय्यद, युवक कार्याध्यक्ष सागर कोल्हे, माजी शहराध्यक्ष राजू गोरे, कार्याध्यक्ष रामहरी गोपाळघरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, काकासाहेब कोल्हे, माजी नगराध्यक्ष विकास तात्या राळेभात, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष उमर कुरेशी, महेंद्र राळेभात, अमर चाऊस, सोशल मीडिया उपाध्यक्ष सागर कोल्हे, मनोज भोरे, जुबेर शेख, बिरंगळ साहेब, माजी सरपंच नीलेश पवार, सरपंच सुनिल आबा उबाळे, मगर साहेब, भाऊसाहेब कसरे, अविनाश पठाडे,रावसाहेब जाधव, संदीप गायकवाड,बापू कार्ले, सरपंच बाळासाहेब खैरे, युवा नेते चरण कदम, प्रशांत वारे,दत्ता डीसले, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले,” यापूर्वी असे कौटुंबिक कार्यक्रम होत नव्हते. महिला भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर निघत नव्हत्या. कारण त्यांना सुरक्षित वाटत नव्हतं. आपण मागील चार -पाच वर्षांपासून कार्यक्रम घ्यायला लागलो. महिला भगिणीं बाहेर निघायला लागल्या. बोलायला लागल्या. मत मांडायला पुढे झाल्या; त्यांची मतं खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून आपण अशा प्रकारचे कार्यक्रम घेतो आणि त्याला असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. काही लोक म्हणायचे असे कार्यक्रम कुठे ? तर फक्त मुंबई – पुण्याला ; मात्र कर्जत -जामखेड मध्यें पण कार्यक्रम घेण्याची ताकत आहे. यापुढे ही हे कार्यक्रम असेच सुरू राहतील ; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आकर्षण असणाऱ्या सिनेतारका सोनाली कुलकर्णी यांनी गाण्याच्या तर ऋता दुर्गुळे यांनी मालिकेच्या टायटल साॅंगवर नृत्याची आदाकारी सादर केली ; प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या माध्यमातून उत्स्फूर्त ‘दाद’ दिली.