जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार हे दुटप्पी – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
आगामी निवडणुकीत आमदार राम शिंदे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहा
लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्या म्हणता अन् दुसरीकडे तुम्ही कोर्टात जाता, लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली, तेव्हा सर्वात पहिले आमदार रोहित पवारांनी योजनेचे बॅनर मतदारसंघात लावले. एका बाजूला तुम्ही बॅनर लावतात, तसेच योजनेवर, महिलांवर व सरकारवर टीका करतात की, पंधराशे रूपयांत काय होणार? हा दुटप्पीपणा काय कामाचा? असा सवाल केंद्रीय राज्य मंत्री रक्षाताई खडसे यांनी आमदार रोहित पवारांवर जोरदार टीका केली. आमदार रोहित पवार हे बँनरबाज आमदार आहेत. आगामी निवडणुकीत आमदार राम शिंदे यांच्या पाठिशी उभे राहा असे सांगितले.
जामखेड येथील विठाई लॉन्स येथे आमदार प्रा राम शिंदे वज्ञमहायुतीच्या वतीने ३० ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे बोलत होत्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपा महिलाज्ञआघाडी तालुकाध्यक्ष संजीवनीताई पाटील, कमलताई राळेभात,भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अर्चनाताई राळेभात, प्रांजलताई चिंतामणी, माजी नगराध्यक्ष अर्चनाताई राळेभात, सुनिताताई बारवकर,मनिषाताई मोहळकर, मंजुषाताई जोकारे, मुक्ताताई गोपाळघरे, सविता सानप, आरपीआय च्या रुक्साना पठाण,ज्ञलक्ष्मीताई पवार, स्वाती यादव, यास्मिन कुरेशी, शाहजान खान, अश्विनी दळवी, वर्षा अंधारे, मनिषा वडे, प्रतिभा रेणूरकर, उज्वला राळेभात, आशाताई वाघ, सोनाली कर्डिले, प्रियंका शेलार आदी महिला पदाधिकाऱ्यासह मोठ्या प्रमाणात महिला व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे ह्या होत्या. रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो माता भगिनींनी लाडक्या रामभाऊला राख्या बांधत हा सोहळा साजरा केला. रक्षाबंधन सोहळ्यास जामखेड शहरातील महिला भगिनींनी मोठा प्रतिसाद दिला.
पुढे बोलताना रक्षाताई खडसे म्हणाल्या, बहिणींचे फार्म भरून झालेले आहेत. यातील बहूतांश बहिणींच्या खात्यावर योजनेचे पैसे प्राप्त झाले आहेत. कर्जत-जामखेडमध्ये या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे, असे म्हणत खडसे यांनीआमदार शिंदे यांच्या कामाचे कौतूक केले.
त्याचबरोबर आगामी निवडणुकीत मतदारसंघातील सर्व महिलांनी आमदार शिंदे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे रहावे, असे अवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेतून आपल्या मतदारसंघातील 94 हजार1592 बहिणींना या योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिला राहिल्या आहेत त्यांनाही याचा लाभ दिला जाणार आहे, असे सांगत माझ्या लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुम्हाला कसलीही अडचण येऊ द्या, संकट येऊ द्या, तेव्हा फक्त एक फोन करा, तुमचा हा ‘रामभाऊ’ तुमचा ‘सख्खा भाऊ’ म्हणून सदैव तुमच्या मदतीला धावून येईल.
मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका, लोकांनी विरोधकाचा भुलभुलैय्या ओळखला आहे. आता तुम्हाला मतदारसंघात जास्त काळ शिरकाव आणि टिकाव शक्य नाही, पण तुमच्या लाडक्या भावांनी सांगितलयं की, पंधराशेची ही योजना तीन हजारापर्यंत घेऊन जाऊ आणि सावत्र भाऊ म्हणतात की आम्ही कोर्टात जाऊ, विरोधक लाडकी बहिण योजनेच्या माध्यमांतून राज्यातील तमाम बहिणींच्या विरोधात बोलत आहेत. महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली, मात्र सावत्र भाऊ म्हणतात की, पैसे शिल्लक आहेत का ? बजेटला तरतुद केलीय का? योजना चालू राहणार आहे का ?त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता विरोधकांचा कायमचा बंदोबस्त करावा. पण येणाऱ्या काळात माझ्या लाडक्या बहिणींना मला मत देण्याची संधी मात्र मी निर्माण करून देणार आहेत, असे म्हणत शिंदे यांनी आपणच विधानसभेचा उमेदवार आहोत हे पुन्हा एकदा घोषित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन संगिता पारे यांनी केले.