जामखेड न्युज——
ज्ञानराधा मल्टिस्टेट संस्थेतील ठेवी मिळाव्यात म्हणून ठेवीदारांचे माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे
यांना साकडे
ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी ठेवीदारांच्या वतीने माजी मंत्री आमदार प्रा राम शिंदे यांच्या कडे केली आहे. त्यांनीही लवकरात लवकर ठेवीदारांचे पैसे कसे मिळतील हे पाहू असे आश्वासन दिले.
काही दिवसांपूर्वी नाही जातीसाठी लढा मातीसाठी गरीबांच्या हक्कासाठी असे घोषवाक्य घेऊन हभप अँड. महारुद्र ना गरगोजे जामखेड तहसील कार्यालया समोर विविध मागण्यांसाठी तीन दिवस
उपोषण केले होते.
जामखेड सह विविध ठिकाणी ज्ञानराधा पतसंस्थेच्या संचालक मंडळावर ४२ गुन्हे दाखल झाले आहेत. लवकरात लवकर ठेवीदारांचे पैसे मिळावेत म्हणून आमदार रोहित पवार यांनीही राज्यपाल यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती.
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टे को-ऑप सोसायटीकडे कर्जत-जामखेड तालुक्यातील सुमारे साडेसहा हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या ९० कोटी रुपयांहून अधिक ठेवी आहेत. परंतु या संस्थेकडून या ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. या संस्थेची चौकशी करुन कारवाई करावी आणि कर्जत- जामखेड मतदारसंघातील ठेवीदारांसह सर्वच ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठीही आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यामुळे ठेवीदारांमध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
“सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ”
मुलांमुलींच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी विश्वासाने अनेकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेत आपल्या आयुष्याची पुंजी ठेवली, स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन, मोलमजुरी करून, सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य व्याजाच्या पैशावर गुजरान करावी म्हणून जामखेड परिसरातील ठेवीदारांनी ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी आहे.