प्रा. मधुकर राळेभात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला रामराम रोहित पवार कार्यकर्त्यांना बारामती अँग्रोचे कर्मचारी समजतात

0
3497

जामखेड न्युज——

प्रा. मधुकर राळेभात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला रामराम

रोहित पवार कार्यकर्त्यांना बारामती अँग्रोचे कर्मचारी समजतात

मागील विधानसभा निवडणुकीत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही सहभागी झालो व स्थानिक कॅबिनेट मंत्र्याला पराभूत करून रोहित पवार यांना आमदार म्हणून निवडून आणले. पण गेल्या साडेचार वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न ठेवता बारामती अँग्रो लिमिटेड कामगारासारखी अवस्था केली आहे. त्यामुळे त्यांच्या एकाधिक शाहीला कंटाळून प्रा. मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला व पुढील भूमिका कार्यकर्त्यांना विचारून लवकरच ठरवू असे सांगितले.

आज प्रा. मधुकर राळेभात यांनी जामखेड येथे पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकला यावेळी नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, महालिंग कोरे राष्ट्रवादी खर्डा शहराध्यक्ष, राजेंद्र वारे रत्नापूर उपस्थित होते.


यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की,
आमदार रोहित पवार म्हणतात कर्जत जामखेड चा विकास केला पण कर्जत जामखेड मतदारसंघात आजही अनेक समस्या आहेत. फक्त प्रशासकीय इमारती झाल्या म्हणजे विकास नव्हे. दवाखाने बांधले पण डॉक्टर नाहीत. पंचायत समिती इमारत झाली पण मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघात अनेक अडीअडचणी चा सामना सामान्य माणसाला करावा लागत आहे.
आमदार रोहित पवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांनाच कसलीही किंमत देत नाहीत यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर मित्र पक्षाला कसलीही किंमत दिलेली नाही. शिवसेना व काँग्रेस पक्षाला कसलीही किंमत दिली नाही त्यामुळे सर्वच नाराज आहेत.

रोहित पवार यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून पक्षातील व मित्र पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. कोणाला कसलीही किंमत देत नाहीत. कार्यकर्त्यांना बारामती अँग्रोचे कर्मचारी समजतात. अनेकांना दम देतात. ज्यांनी पक्षासाठी आयुष्यभर काम केले त्यांना कसलीही किंमत देत नाहीत. हुकुमशाही पद्धतीने वागतात.

२०२४ ची विधानसभा निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच होईल. रोहित पवार यांच्या विरोधात स्थानिक सर्व नेते एकत्र राहणार आहेत.
पैसे वाटून व साहित्य वाटून आमदार होता येत नाही हे पवारांनी लक्षात ठेवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here