व्हाटस्अप स्टेटस ठेऊन शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांने संपवली आपली जीवनयात्रा सौताडा धबधबा येथे आत्महत्या

0
3739

जामखेड न्युज——

व्हाटस्अप स्टेटस ठेऊन शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांने संपवली आपली जीवनयात्रा

सौताडा धबधबा येथे आत्महत्या

 

बीड जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पाटोदा येथील पंचायत समितीमध्ये समावेशित शिक्षण विभागाचे साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेले गजेंद्र गुंडाले-रेड्डी हे दोन दिवसापासून बेपत्ता होते. गुंडाले यांची दुचाकी गाडी ही पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्याजवळ आढळून आली. गुरुवारी दिवसभर कर्मचारी आणि त्यांच्या मित्रांनी सौताडा परिसरातील धबधब्याजवळ आणि खाली उतरून सर्वत्र शोधाशोध केली परंतु गुंडाले हे आढळून आलेले नव्हते.


दिनांक 23 रोजी सकाळी श्रीराम मंदिराच्या समोर डोहामध्ये सदरील कर्मचाऱ्यांचा मृतदेह सापडला असून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान गुंडाले यांनी दोन दिवसांपूर्वी मोबाईलवर संदेश पाठवला होता की

मी आज पर्मनंट झालो आहे. परंतू मला माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य आई बायको यांची साथ नाही….

मुख्यमंत्री यांनी समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचारी विशेष शिक्षक यांना कायम करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या वर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद चर्णी रोड मुंबई यांनी काम सुरु केले..

इकडे या लोकांकडुन पैसे उकळण्या साठी यांच्या संघटना पुढे सरसावल्या…

4 वर्षा पुर्वी कायम करतो म्हणून संघटनेच्या काही लोकांनी हवाला मार्फत प्रत्येकी 90 हजार रुपये गोळा केले .
3100 लोक गुणिले 90 हजार या प्रमाणे..

त्या नंतर नुकतेच मुख्यमंत्री यांनी घोषणा केली असता पुन्हा संघटना जागृत झाल्या आणि राज्यभरातील 3100 लोकांकडून पुन्हा प्रत्येकी 20 हजार रुपये जमा करायला सुरवात केली.

बीड येथे देखील त्याची मिटींग झाली. आणि त्या मिटींग मधे सांगण्यात आले की जो कोणी विशेष शिक्षक 20 हजार रुपये देणार नाही त्याचे काम आम्ही होऊ देणार नाही.


हे सर्व पाहुन 20 हजार पगार असलेल्या गुंडाले नी आई व बायकोला मिटींग संपल्यानंतर संपर्क केला…
आई चा व बायकोचा सपोर्ट नाही हे पाहून त्यानी स्टेट्स ठेऊन थेट सौताडा गाठला. व जीवन यात्रा संपवली.
याचा शोध व्हावा व एका गरीब बेबस कंत्राटी कर्मचारी यास व त्याच्या कुटुंबातील छोट्या छोट्या लेकरांना न्याय मिळावा. अशी मागणी होत असून पुढील तपास पाटोदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उबाळे हे पोलीस निरीक्षक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here