जामखेड तालुक्यात हागणदारीमुक्ती फक्त फलकावरच अनेक गावातील नागरिकांच्या हातात टमरेल, शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

0
391

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात हागणदारीमुक्ती फक्त फलकावरच

अनेक गावातील नागरिकांच्या हातात टमरेल, शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

 

केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेविषयी अनेक योजना राबवते. या योजनांवर कोट्यावधींचा निधी खर्च होतो. अशीच स्वच्छतेची ‘हागणदारी मुक्त गाव’ योजना शासनाने राबवली होती. यामध्ये तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग देखील घेतला होता. मात्र आजही तालुक्यातील गावे हागणदारी मुक्त झाली, याबाबतची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात येत नाही.

जामखेड तालुक्यातील अनेक गावातील परिस्थिती खुपच भयानक आहे. लोकांनी शासनाचे अनुदान घेऊनही शौचालयाचा वापर करताना दिसून येत नाहीत. याचा त्रास शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतो. उघड्यावर शौचास जाणारे हातात टमरेल घेतात दुसऱ्या हातात पंधरा वीस हजार रुपयांचा मोबाईल असतो. उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील अनेक गावामध्ये हागणदारी मुक्तीचे फलक लावण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर अनेक गावांना हागणदारी मुक्तीचे पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले होते. परंतु सध्या वास्तव वेगळेच पहायला मिळतं आहे. फलक फक्त नावालाच उरले आणि गावातील नागरिकांच्या हाती टमरेल दिसत आहे. खेड्यांत जवळपास प्रत्येक गावात प्रवेश करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. बऱ्याच ग्रामपंचायतींनी गावात हागणदारी मुक्तीचे फलक लावले आहेत. मात्र फलकावरील योजना या फलकावरच राहिल्या आहेत.


अनेक गावांतील शाळा गावबाह्य असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दुर्गंधीग्रस्त रस्त्याने प्रवास करावा लागतो. केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेविषयी अनेक योजना राबवते. या योजनांवर कोट्यावधींचा निधी खर्च होतो. अशीच स्वच्छतेची ‘हागणदारी मुक्त गाव’ योजना शासनाने राबवली होती. यामध्ये तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग देखील घेतला होता. मात्र आजही तालुक्यातील गावे हागणदारी मुक्त झाली, याबाबतची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात येत नाही.

दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी ग्रामपंचाय स्तरावरील स्वच्छ भारत मिशन घरोघरी शौचालय कार्यक्रमांतर्गत घरोघरी शौचालय बांधण्यास शासनाने लाभार्थांना अनुदान दिले होते. तरी देखील बहुतांश नागरिक हे उघड्यावरती, रस्त्याच्या बाजूस शौच करण्यासाठी जातात. त्यामुळे गावात येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. खेड्या गावांत बहुतांश शाळा गावबाह्य आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंचा प्रवास पायी करावा लागतो. पण त्यातही अशा दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे नकोसे वाटत असल्याचे विद्यार्थ्यांनी बोलावून दाखविले.

अनुदान घेतलेल्यांवर कारवाईची मागणी वैयक्तिक शौचालय वापरायचा लाभ शासनाकडून घेऊनही लाभ घेणाऱ्या बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या घरातूनच काही सदस्य शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जाताना दिसून येतात. गावे हागणदारीमुक्त व्हावीत म्हणून शासनाने निर्मल ग्राम योजना अनेक वर्षे राबवली. यासाठी गावागावात कलापथकद्वारे जनजागृती केली. परंतु आजची परिस्थिती पाहून ग्रामीण भागात हागणदारी मुक्तीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

त्यामुळे शासनाकडून ज्यांनी शौचालय बांधण्यासाठी शासकीय अनुदान घेतले आहे व त्याच परिवारातील सदस्य बाहेर शौचास जात असतील तर अशा लाभ घेतलेल्या कुटुंबाकडून अनुदान वसूल करून दंडात्मक कारवाईची मागणी नागरिक आहेत. आजारांना आमंत्रण सध्या साथीच्या आजारांनी तालुक्यातील बहुतांश गावात थैमान घातले आहे. उघड्यावर शौचास जाणे हे अद्यापही बऱ्याच ठिकाणी सुरुच आहे. यामुळे साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाणीने बरबटलेले रस्ते आरोग्यास धोकादायक ठरू शकते. घरी शौचालय आहे, परंतु त्याचा नियमित वापर, शौचालय स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक सुजाण नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे.

गाव परिसरातील नदी-नाल्यांचे पाणी दूषित झाल्यास मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात,.याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणे नियमितपणे निर्जंतुकीकरण करून, परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र चिखल असतो म्हणून आम्ही डांबरी रस्त्याचा मार्ग शाळेत जाण्यासाठी निवडतो. मात्र गावातीलच काही नागरिक हे घरी शौचालय असताना देखील बाहेर उघड्यावर शौच करण्यासाठी जातात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटते आणि त्यामुळे आम्हाला शाळेला जाणे अवघड झाले आहे. उघड्यावर शौच केल्याने कोणते कोणते विकार होऊ शकतात याच्या आम्ही 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला घोषणा देतो. मात्र गावकरी त्या घोषणा आमलात आणत नाहीत. गावातील नागरिकांचे असे वागणे योग्य नाही, घरी असलेल्या शौचालयाचा त्यांनी उपयोग करायला हवा जेणेकरून कोणालाही अशा अडचणींचा सामना करावा लागणार नसल्याचे विद्यार्थांने सांगितले. आम्ही गावामध्ये जनजागृती केली पण लोक ऐकत नाहीत. गावातील अनेक नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचे नागरिक व विद्यार्थ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here