पांढऱ्या धंद्यातील काळ्या बोक्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात, दहा दिवसांत नगर जिल्ह्यातील 11 दुध संकलन केंद्रावर धाडी जामखेड मधील एक दुध संकलन केंद्र

0
1678

जामखेड न्युज——

पांढऱ्या धंद्यातील काळ्या बोक्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात, दहा दिवसांत नगर जिल्ह्यातील 11 दुध संकलन केंद्रावर धाडी

जामखेड मधील एक दुध संकलन केंद्र

 

गाई म्हशी कमी पण दुध जास्त कसे अनेक दुध संकलन केंद्रावर सर्रास भेसळ दुध भेसळ रोखणारी समिती कडक कारवाई कधी करणार, परवाने रद्द कधी करणार, गुन्हेगारांना जेलमध्ये कधी पाठवणार असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पांढऱ्या धंद्यातील काळ्या बोक्यांच्या मुसक्या सरकारने आवळण्यासाठी सुरूवात केली आहे. ४ लाख १४ हजार रुपयांचे १३ हजार ८०० लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे.

 

मागील दहा दिवसांत दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्यावतीने राहुरी, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सुमारे 11 दूध संकलन केंद्रावर धडक कारवाई केली. त्यात काही केंद्रावरील तपासणीसाठी दुधाचे नमुने घेण्यात आले. काही ठिकाणी भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

28 जुलै रोजी राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील जगदंबा दूध संकलन केंद्र, जगदंबा माता दूध संकलन केंद्र येथील गायीच्या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर शिलेगावातील पतंजली दूध संकलन केंद्राची पथकाने पाहणी केली. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी.बी. पवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एस. पालवे व जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनोने यांनी केली.

1 ऑगस्ट रोजी कोपरगावातील साई अमृत दूध संकलन केंद्र, धोंडेवाडी येथील नारायणगिरी दूध संकलन केंद्र, जवळके येथील प्रशांत भागवत शिंदे यांच्या गोठ्यात कारवाई करण्यात आली. या सर्व ठिकाणचे दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी बडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनोने यांनी केली. 4 ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील कृष्णाई दुध शितकरण केंद्र येथील दुधाचे नमुना घेण्यात आला तसेच 1200 लीटर दुध नष्ट करण्यात आले. तसेच

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भगवान कृपा दुध संकलन केंद्रात दुधाचे नमुने घेण्यात येऊन 3800 लीटर दुध नष्ट करण्यात आले.

कर्जत तालुक्यातील कृष्णाई दुध शितकरण केंद्र, जगदंबा दुध संकलन व शितकरण केंद्र, दूरगाव येथील साईबाबा दुध शितकरण केंद्र, अन्वेषा दुध संकलन केंद्र, मिरजगावातील गजानन महाराज मिल्क व प्रोडक्टस, कुळधरण येथील त्रिमूर्ती दुध संकलन केंद्र, कर्जत येथील सदगुरू मिल्क व प्रोडक्टस, बहिरोबावाडीतील नागराबाई यादव दुध संकलन केंद्र, मिरजगाव येथील अ‍ॅग्रोवन मिल्क प्रोडक्टस येथील दुधाचे नमूने घेण्यात येवून दूध नष्ट करण्यात आले.. गजानन महाराज मिल्क व प्रोडक्टसचे 4200 लीटर दूध नष्ट करण्यात आले.

कारवाईत तब्बल १३ हजार ८०० लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. अहमदनगर दूध भेसळ समितीने ही कारवाई केलीय. दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील याच्या सुचनेनंतर ही कारवाई करण्यात आलीय. दरम्यान नष्ट करण्यात आलेल्या दुधाची किंमत ४ लाख १४ हजार रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here