“शहिदांसाठी एक झाड” उपक्रम नागेश विद्यालयात कारगिल दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम

0
412

जामखेड न्युज——

“शहिदांसाठी एक झाड” उपक्रम

नागेश विद्यालयात कारगिल दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम

 

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील एनसीसी छात्रांनी शहिदांसाठी एक झाड लावून कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना मानवंदना दिली अशी माहिती प्राचार्य मडके बी के यांनी दिली.

कारगिल विजय दिनानिमित्त श्री नागेश विद्यालय मध्ये शहिदांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करण्यात आले. सतरा महाराष्ट्र बटालियन चे नागेश विद्यालयचे युनिटने यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. पंचवीसवा कारगिल दिनानिमित्त विद्यालयामध्ये 25 विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी एनसीसी कॅडेट घेतली.


यावेळी प्रमुख उपस्थिती स्थानिक स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर ,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अशोक यादव, प्राचार्य मडके बी के ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, शिंदे बी एस, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, अजय अवसरे, पालक शिक्षक एनसीसी कॅडेट विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी अमर जवान स्मारकाचे पूजन शहिदांना मानवंदना देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. कारगिल विजय दिनाचा विजय असो, भारतीय सेनेचा विजय असो ,भारत माता की जय ,शहीद जवान तुझे सलाम, या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here