जामखेड न्युज——
जामखेड न्युज बातमीचा इफेक्ट
जामखेड डेपोतील घाण व दलदल पाहण्यासाठी विभागीय अभियंता जामखेड मध्ये
जामखेड बस डेपो परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. चिखल दलदल यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांना चिखलामुळे पायाला चिकण्या पडल्या आहेत तर पाणी दलदल व ओलसरपणा यामुळे अनेक ठिकाणी लाईटचा करंट उतरत आहे. त्यामुळे बसचे काम जीव धोक्यात घालून करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लवकरच कर्मचारी काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर कर्मचाऱ्यांनी सांगितले अशी बातमी जामखेड न्युजने काल प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत नगर येथून स्थापत्य अभियंता दरेकर साहेब आणि सहाय्यक अभियंता राशीनकर साहेब नगर विभाग आपल्या पथकासह जामखेड बस डेपोत दाखल झाले व डेपो परिसराची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
डेपोतील घाण काढणे, पाणी काढून देणे, तसेच घाण होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या जामखेड न्युज बातमीची दखल नगर बस प्रमुखांनी घेऊन ताबडतोप विभागीय अभियंता दरेकर व राशिनकर यांना पाठवले आज जामखेड न्युज चे जामखेड डेपोतील कर्मचारी यांनी आभार मानले.
जामखेड साठी दोन आमदार आहेत तरीही बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आहे. एकीकडे श्रेयवादासाठी दोन्ही आमदारांची चढाओढ असते मात्र बस डेपो परिसरात घाणीचे साम्राज्य असताना व कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असताना मात्र दोन्ही आमदारांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशा आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.
बस डेपो परिसरात सततच्या पावसामुळे पाण्याचे डबके साचत होते म्हणून काही दिवसांपूर्वी बस प्रशासनाने सत्तावीस हजार रुपयांचा मुरूम टाकला पण तो मातीमिस्त्रीत असल्याने पावसामुळे सगळीकडे चिखल झाला आहे. बस डेपो परिसरात चालताही येत नाही. तसेच बस दुरूस्ती करताही येत नाही. कर्मचाऱ्यांना चिखल व दलदली मुळे पायाला दुखापती झाल्या आहेत. तसेच ओलसरपणा मुळे अनेक ठिकाणी करंट उतरत आहे. जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असल्याने तणनाशक फवारणी करण्यात आली पण तणच जळाले नाही. एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, बस प्रशासन दुकानातून फक्त बीलच घेतात औषध घेतच नाहीत. किंवा निरुपयोगी तणनाशक घेतात यामुळे तण जळत नाही याचा परिणाम परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांचे साम्राज्य आहे.
वर्कशॉप मध्ये सध्या 45 कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करत आहेत. सध्या चिखल दलदल यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आरोग्य धोक्यात घालून काम करावे लागत आहे. पायाला चिकण्या पडल्या आहेत. डासांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे. यामुळे कर्मचारी काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लवकरात लवकर चांगल्या प्रतीचा मुरूम टाकावा, चांगले तणनाशक मारावे, घाण कमी करावी अन्यथा लवकरच काम बंद आंदोलन करण्याचा इशारा नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
जामखेड मध्ये नवीन बसस्थानकाचे संथ गतीने काम सुरू आहे. सध्या बस स्थानकाची अवस्था खुपच वाईट झालेली आहे, सगळीकडे चिखल दलदल व घाणीचे साम्राज्य आहे. यामुळे सर्रास डुकरांचा वावर असतो. अनेक लोक उघड्यावरच लघवी करतात. यामुळे बसस्थानक परिसरातील नागरिकांची कुचंबणा होते. लोकांना ये जा करता येत नाही सगळीकडे चिखल दलदल आहे. याकडे मात्र अधिकारी व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष आहे.
शहरातील बस स्थानकाचे काम सुरू आहे. काम संथ गतीने काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. बसस्थानक
परिसरात सध्या चिखल दलदल व घाणीचे साम्राज्य आहे.
या बातमीची दखल घेत विभागीय स्थापत्य अभियंता दरेकर साहेब आणि सहाय्यक अभियंता राशीनकर साहेब यांनी आज पाहणी केली व घाण, दलदल होणार नाही या सूचना दिल्या.