जामखेड बस स्थानकात घाणीचे साम्राज्य, चिखल, दलदल व कचऱ्याचे ढिग, प्रवाशांची कुचंबणा

0
786

जामखेड न्युज——

जामखेड बस स्थानकात घाणीचे साम्राज्य, चिखल, दलदल व कचऱ्याचे ढिग, प्रवाशांची कुचंबणा

 

जामखेड मध्ये नवीन बसस्थानकाचे संथ गतीने काम सुरू आहे. सध्या बस स्थानकाची अवस्था खुपच वाईट झालेली आहे, सगळीकडे चिखल दलदल व घाणीचे साम्राज्य आहे. यामुळे सर्रास डुकरांचा वावर असतो. अनेक लोक उघड्यावरच लघवी करतात. यामुळे बसस्थानक परिसरातील नागरिकांची कुचंबणा होते. लोकांना ये जा करता येत नाही सगळीकडे चिखल दलदल आहे. याकडे मात्र अधिकारी व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष आहे. याबाबत स्थानक प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. 

शहरातील बस स्थानकाचे काम सुरू आहे. काम संथ गतीने काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. बसस्थानक परिसरात सध्या चिखल दलदल व घाणीचे साम्राज्य आहे.

जामखेड शहरात सध्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जागोजागी घाणीचे साम्राज्य, अनेक ठिकाणी दुर्गंधी, जागोजागी कचऱ्याचे ढिग, दलदलीचे रस्ते, जागोजागी अतिक्रमणे, राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून गटाराशेजारीच अतिक्रमणे झालेली आहेत. नगरपरिषदेची गटार, पाणीपुरवठ्याची पाईप लाईन कशी होणार अशा अनेक समस्या सध्या जामखेड शहरात आहेत. याकडे मात्र अधिकारी व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष आहे. नागरिक मात्र समस्येच्या गर्तेत आहेत.

सध्या जामखेड शहरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्याने धड चालताही येत नाही. सगळीकडे चिखल, दलदल तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अधिकारी व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष आहे. जामखेड चे रस्ते म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक व विद्यार्थी यांना मोठ्या अडचणी चा सामना करावा लागत आहे.

जामखेड नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे
दोन वर्षांपासून पदभार आहे. प्रशासक म्हणून कर्जत उपविभागीय अधिकारी डॉ. देशमुख आहेत. ते कधीच नगरपरिषदेत येत नाही ५० हजार लोकसंख्या असलेल्या जामखेड शहरात हे दोन्ही अधिकारी फिरकले नाही केवळ कार्यालयात बसून काम चालते सर्वसामान्य नागरिकांच्या कितीही तक्रारी आल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही. त्यातच मुख्याधिकारी साळवे यांना नऊ दहा महीन्यापासून कर्जत नगर पंचायतचा प्रभारी पदाचा पदभार आहे. या पंचायतमध्ये लोकप्रतिनिधी नियुक्त नगवराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व नगरसेवक आहेत. पण तेथे मुख्याधिकारी नाही. जामखेडची पाणीपुरवठा योजना,शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर कोट्यावधी रूपयाची कामे मोठय़ा प्रमाणावर चालू आहे.

 

ज्या ठिकाणी आरोप होतील त्या संबंधितांना केवळ नोटीसा द्यायच्या मात्र काहीच कारवाई करायची नाही व नागरीकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करायचे याबाबत मुख्याधिकारी साळवे यांचा हातखंडा आहे.

बसस्थानक परिसरात सध्या सगळीकडे चिखल दलदल व घाणीचे साम्राज्य आहे. यामुळे सर्रास डुकरांचा वावर असतो. अनेक लोक उघड्यावरच लघवी करतात. यामुळे बसस्थानक परिसरातील नागरिकांची कुचंबणा होते. लोकांना ये जा करता येत नाही सगळीकडे चिखल दलदल आहे. याकडे मात्र अधिकारी व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here