जामखेड न्युज – – – –
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वाधिक करोना रुग्णसंख्या असलेल्या ६ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यामध्ये अर्थातच महाराष्ट्राचाही समावेश होता. या चर्चेमध्ये मोदींनी महाराष्ट्रात वाढणाऱ्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त केली. त्यावर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उलट केंद्रालाच विनंती करून व्यापक धोरण आखण्याची मागणी केली आहे.
“कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावे”, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.