भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने, टी-20 विश्वचषकासाठी दोन्ही संघ एकाच गटात

0
202
जामखेड न्युज – – – 
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा सर्वांसाठी केवळ सामना आणि मैदानापुरता उरत नाही तर देशप्रेमापर्यंत जातो. क्रिकेटप्रेमींसाठी आता एक मोठी बातमी येत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानात भिडणार आहेत. टी 20 वर्ल्ड कपसाठीचे ग्रूप आयसीसीने जाहीर केले आहेत. या ग्रुपमध्ये सुपर 12 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघाला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे.
युएईत रंगणार थरार
आयसीसीने टी -20 वर्ल्ड कपच्या ग्रूपची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये स्थान देण्यात आलं आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजला दुसर्‍या गटात स्थान देण्यात आलं आहे. या स्पर्धेचे सामने 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान UAE आणि ओमान इथे होणार आहेत. एकूण 16 संघ टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत.
*टी 20 वर्ल्डकप सुपर 12 मध्ये दोन गटांत कोणते संघ*
ग्रुप 1: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, वेस्टइंडीज, ए 1, बी 2
ग्रुप 2: भारत, पाकिस्तान, न्यूझिलंड, अफगानिस्तान, बी 1, ए 2
*8 संघाची 2 ग्रुपमध्ये वर्गवारी*
क्वालिफायर स्टेजमध्ये 8 संघांची 2 ग्रुपमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. सुपर 12 मधील 2 गटांमध्ये सध्या 8 संघांचा समावेश आहे. क्वालिफायर स्टेजमध्ये दोन्ही गटांमधून प्रत्येकी 2 संघ सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. त्यानंतर वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात होईल.
ग्रुप अ: श्रीलंका, आयरलॅंड, नेदरलॅंड, नामबिया
ग्रुप ब: बांग्लादेश, स्कॉटलॅंड, पपुआ न्यू गिनी, ओमान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here