जामखेड न्युज – – –
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमध्ये अव्वल मुख्यमंत्री ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजप नेते उत्तर प्रदेशचं कौतुक करत असतात, पण या सर्वेक्षणात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पाचवा नंबर आहे, हे भाजपने विसरु नये” असा टोला रोहित पवारांनी लगावला. रोहित पवारांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंचं अभिनंदन तर केलंच, शिवाय भाजपवरही निशाणा साधला.
रोहित पवार म्हणाले, “प्रश्नम’ या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे मविआ सरकारचं यश आहे. उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!”
मुख्यमंत्री अव्वल
प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. द प्रिंटने त्याबाबत बातमी दिली आहे.