आदर्श मुख्याध्यापक विकास वराट यांचा सेवापुर्ती सोहळा शनिवारी

0
2163

जामखेड न्युज——

आदर्श मुख्याध्यापक विकास वराट यांचा सेवापुर्ती सोहळा शनिवारी

 

पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथील जगदंबा विद्यामंदिर चे आदर्श मुख्याध्यापक विकास वराट हे आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापुर्ती सोहळा शनिवारी दि. 13 रोजी धनगरजवळका येथील जगदंबा विद्यामंदिर येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी आपण उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जगदंबा विद्यामंदिर धनगरजवळका येथील मुख्याध्यापक विकास वराट यांच्या 34 वर्षाच्या सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत. त्याचा सेवापुर्ती सोहळा शनिवारी दि. 13 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेषराव रावसाहेब काळे अध्यक्ष श्री जगदंबा विद्यामंदिर धनगरजवळका तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सुरेश आण्णा धस, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय नवले, नगराध्यक्ष राजूभैय्या जाधव, शिक्षणाधिकारी माध्यमिक बीड नागनाथ शिंदे, पवार पी. एस, सचिव जगदंबा विद्यामंदिर धनगरजवळका, विक्रम पोकळे माजी शिक्षणाधिकारी, प्रा. मधुकर राळेभात, सौ. उज्वला जंगले स्थायी सदस्य समिती पुणे, सुरेखा पवार सरपंच धनगरजवळका, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट सर, सोमनाथ राळेभात, डॉ. भगवानराव मुरूमकर माजी सभापती पंचायत समिती जामखेड, दत्तात्रय वारे, रामराव काळे, अमित चिंतामणी, कैलास वराट उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड, पिंटुशेठ जाधव सभापती पाटोदा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.

तसेच या कार्यक्रमासाठी विनोद नवले, अभयकुमार पवार, दिगंबर चव्हाण, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, शरद पारखे, सुरेश काळे, प्राचार्य भगवान मडके, हिराबाई काळे, नवनाथ काळे, हरिश्चंद्र येवले, हनुमंत काळे, रोहिदास गिते, परसराम टेळाळे, अशोक पवार, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, विजय पोकळे, सुरेश काळे, अँण्ड उत्तमराव जाधव, बाळासाहेब पवार, प्राचार्य महादेव पडवले, प्राचार्य हरिभगत सर, पवार एस. के. तुकाराम तुपे, सुरेश वराट, बाळासाहेब वराट, शहाजी येवले, श्रीहरी येवले, राम मोरे, एल. आर. जाधव यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर जगदंबा विद्यामंदिर धनगरजवळका तसेच पारेश्वर विद्यालय पारनेर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here