जामखेड न्युज——
सारोळा शाळेची इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग कामगिरी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथील इयत्ता पाचवीच्या वर्गातील एकूण नऊ विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२४ मध्ये पात्र ठरले असून त्यापैकी शौर्य ब्रम्हदेव हजारे याने राज्य गुणवत्ता यादीत १४ वा व जिल्हा गुणवत्ता यादीत ३रा क्रमांक संपादन केला आहे.
तसेच तनुजा भरत सांगळे व धनश्री अनिल काशिद यांनीही जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्ती धारक होण्याचा बहुमान संपादन केला आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थी यांना मुख्याध्यापक माजीद शेख ,वर्गशिक्षक खंडेराव सोळंके ,मार्गदर्शक शिक्षक राहुल लिमकर ,प्रशांत होळकर,शबाना शेख व अमृता रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परिक्षेतील उत्तुंग कामगिरीबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक सर्व शिक्षक वृंदांचे,जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, जामखेड बीट शिक्षण विस्तार अधिकारी संजय नरवडे, केंद्रप्रमुख सुरेश मोहिते,
तसेच सारोळा गावच्या सरपंच रितूताई काशिद,अजयदादा काशिद,उपसरपंच हर्षद मुळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर सातपुते,उपाध्यक्ष राजेंद्र आजबे,पालक व ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन करुन भविष्यातील उज्ज्वल शैक्षणिक वाटचाली करिता मनस्वी शुभेच्छा दिल्या.