जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात मानवी सांगाडा आढळल्याने एकच खळबळ
जामखेड तालुक्यातील धामणगाव शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या इसमास मानवी शरीराचा सापळा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एखादा व्यक्ती हरवलेली आसेल तर त्यांनी खर्डा पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन खर्डा पोलीसांनी केले आहे.
याबाबत सचिन सदाशिव नंदिरे राहणार धामणगाव यांनी खर्डा पोलीस स्टेशन येथे खबर दिली या खबरे मध्ये त्यांनी म्हटले आहे की ते नेहमीप्रमाणे शेळ्या चालण्यासाठी वनदरा धामणगाव या डोंगर परिसरात गेलो असता त्यांना घाण वास आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता अज्ञात मानवाची कवटी व मानवी शरीराचा सापळा दिसून आला.
यासंदर्भात त्यांनी धामणगाव चे सरपंच महारुद्र महारनवर यांना माहिती दिली. अज्ञात व्यक्तीचा मानवी सापळा मिळून आल्यावर सरपंच महारुद्र महानवर यांनी खर्डा पोलीस स्टेशन येथे संपर्क केला व सदरची माहिती खर्डा पोलीसांनी दिली.
यानंतर खर्डा पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून घटनास्थळी रवाना झाले. या घटनेची माहिती सचिन नंदिरे यांच्या खबरीवरून माहिती घेण्यात आली व त्यांनी खर्डा पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. या खबरी वरून खर्डा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन त्यांनी मानवी सापळा व सांगाडा ताब्यात घेतला. मृत व्यक्तीचे अंदाजे वय ३० ते ४० असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल रावसाहेब नागरगोजे, पोलिस कॉन्स्टेबल संजय जायभाय, विष्णू आवारे, पंडित हंबर्डे, बाळासाहेब खाडे, गणेश बडे यांच्यासह पोलीस सहकारी यांनी जाऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय झंजाड करत आहे.
सदर सापळ्याच्या शेजारी लाल चौकड्या रंगाचा शर्ट, काळा कलरची पॅन्ट व काळसर जर्किन आढळून आले संबंधित कपड्याच्या वर्णन किंवा अज्ञात कोणी व्यक्ती हरवला असेल तर वरील माहितीच्या अंदाजावरून खर्डा पोलीस स्टेशन येथे ०२४२१/२४०२३३ किंवा ८६६९००३२९८ संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांन कडून करण्यात आले.