डॉ. भास्कर मोरेवर हरिण प्रकरणी गृहखात्याने कडक कारवाई‎ करावी – राम शिंदे रत्नदीप विरोधात पांडुरंग भोसले व विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस

0
1017

जामखेड न्युज——

डॉ. भास्कर मोरेवर हरिण प्रकरणी गृहखात्याने कडक कारवाई‎ करावी – राम शिंदे

रत्नदीप विरोधात पांडुरंग भोसले व विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस

 

आमदार राम शिंदे यांनी शनिवारी अधिवेशनात रत्नदीप मेडिकल महाविद्यालया संदर्भात सभागृहात लक्षवेधी मांडली विद्यार्थी व विद्यार्थिंनींचे इतर ठिकाणी स्थलांतर करावे, हरिण प्रकरणाची चौकशी करावी “रत्नदीप’च्या सर्व मान्यता रद्द करून शासकीय स्तरावर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.

आमदार प्रा. शिंदे यांच्या लक्षवेधी ला उत्तर देताना
जामखेड येथील रत्नदीप मेडिकल महाविद्यालय संस्थेत सात संस्था चालतात. त्यात अनियमितता दिसुन येत आहे. या संस्थेवर कारवाई करून उच्च तंत्रज्ञान विभागामार्फत चौकशी करून मान्यता रद्द करण्यात येईल. हरिण प्रकरणी वनविभागा मार्फत शासकीय स्तरावर चौकशी समिती नेमली जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.


तसेच आ. मनिषा कायंदे यांनी या संस्थेला सुरुवातीला ज्या समिती सदस्यांनी मुल्याकंन करून खोटे रिपोर्ट दिले आहेत, त्यांच्या वर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. याला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही संस्थेला ज्या अधिकारी यांनी परवानगी दिल्या आहेत, त्या कशा दिल्या याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.


रत्नदीप विरोधात आंदोलन अधिक तीव्र

रत्नदीप विरोधात आंदोलनाचा आजच्या चौथ्या दिवशी आंदोलन अधीक तीव्र होत आहे. तीन महिन्यापूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड चे पांडूराजे भोसले यांनी तीव्र आंदोलन सुरू करून ते नऊ दिवस अमरण उपोषणास बसले होते. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानुसार सर्व विद्यार्थ्यांचे तीन महिन्यात ट्रान्सफर होऊन सदरील संस्था व संस्थाचालक भास्कर मोरे यांच्या वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासित केल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते, परंतु आज तीन महिने झाले तरी विद्यार्थ्यांचे ट्रान्सफर झालेले नाही व सदर संस्था व संस्था चालक भास्कर मोरे वरती विद्यापीठ व शासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने पुन्हा पांडुराजे भोसले व सर्व विद्यार्थी दिनांक 27 जून पासून आंदोलनास बसले आहेत

काल दिनांक 29 जून आंदोलन चा तिसरा दिवस होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे रायगड या विद्यापीठामार्फत डॉ प्रदीप बोडखे व एस आर भगत यांनी विद्यापीठा मार्फत होत असलेल्या कारवाईबाबत उपोषण स्थळी येऊन अस्वस्थ केले परंतु विद्यापिठाकडून होत असलेली कारवाई समाधानकारक नसून विद्यापीठाचा वेळ काढू पणा आहे असे दिसून येत आहे जोपर्यंत विद्यार्थ्यांचे ट्रान्सफर होत नाही व आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण असेच चालू राहणार आहे व यादरम्यान कोणाच्या जीवितास काही हानी झाल्यास व एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास विद्यापीठ व प्रशासन संपूर्ण जबाबदार असणार असे मत यावेळी पांडुरंग भोसले यांनी व्यक्त केले.

असे बोलत असताना सदरील संस्था व संस्थाचालक भास्कर मोरे यांनी विद्यापीठाची केलेली फसवणूक, विद्यार्थ्यांची केलेली आर्थिक, शारीरिक व मानसीक पिळवणूक, विद्यार्थ्यांना धमकावून जमवलेली अब्जावधी रूपयांची संपत्ती, मुख्यमंत्रीसाहेब यांच्या आश्वासनानंतर स्थापन केलेल्या समितीवरील कार्यवाही, संस्थेच्या नियम व त्यांचे उल्लंघन करून धर्मदायक त्यांची केलेली फसवणूक या अशा सर्व प्रकरणाची वेगवेगळे गुन्हे संस्था व भास्कर मोरे यांच्यावर दाखल करून त्यांना शिक्षा करावी तसेच कॉलेजच्या आवारामध्ये दोन हरीण पाळल्याबद्दल वनविभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यातील एक हरीण जखमी अवस्थेत कॉलेजच्या आवारात सापडले परंतु त्या व्हिडिओमधील दुसरे हरणाचे काय झाले ते कुठे गेले तसेच कॉलेजच्या आवारात आढळून आलेले हरणाचे अवशेष हे कोणत्या हरणाचे आहेत ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे या सर्व बाबींचा उलगडा होऊन प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत संस्था व संस्थाचालक यांच्यावर फास्टट्रॅक कोर्टात केस चालून लवकरात लवकर कार्यवाही व्हावी वन विभाग कडून देखील होत असलेल्या कार्यवाहीवर पांडुरंग भोसले यांनी खंत व्यक्त केली व वनविभाग कडून सदरील संस्था व भास्कर मोरे यांच्यावर कारवाई न झाल्यास याबाबत भविष्यात मोठे आंदोलन उभा करून असा इशारा दिला.

रत्नदिप कॉलेज चे अध्यक्ष भास्कर मोरे यांच्यावर वन विभागाने कॉलेजच्या आवारात हरीण जखमी अवस्थेत अडळुन आल्याने गुन्हा दाखल झाला होता कॉलेजच्या व्हिडिओ मध्ये एकुण दोन हरणे होती त्यातील एक जखमी अवस्थेत सापडल आणि कॉलेज आवारात खोद काम केल्यानंतर हरणाचे काही अवशेष सापडले हे प्रकरण गंभीर असताना देखील वन विभागाने तपास काळजीपूर्वक केला नाही दुसरे हरीण कुठे ठेवले याचा खुलासा वन विभागाने दिला पाहिजे याची सखोल चौकशी करावी असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष पांडुराजे मधुकर भोसले यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here