जामखेड न्युज——
जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणारच – आमदार किशोर भाऊ दराडे
जामखेडमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक यांचा भव्य मेळावा संपन्न

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारासाठी आज जामखेड येथे आमदार किशोर भाऊ दराडे यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. मतदारांना संबोधित करताना आमदार किशोर भाऊ दराडे यांनी सांगितले की, जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी सुद्धा पेन्शन घेणार नाही. जूनी पेन्शन योजनेचा प्रश्न आचारसंहितेंनंतर मार्गी लावणार असे ठाम आश्वासन दिले.

विधान परिषदेची नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 जाहीर झालेली असून सध्या निवडणूक प्रचार जोरदार सुरू आहे या प्रचाराच्या निमित्ताने जामखेड तालुक्यात दिनांक 16 जुन 2024 रोजी विद्यमान आमदार किशोर भाऊ दराडे यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी जामखेड तालुक्यातील मुख्याध्यापक प्राध्यापक व शिक्षक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना शिक्षकांनी किशोर दराडे यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले व जामखेड तालुक्यातून किशोर दराडे यांना पहिल्या पसंतीचे भरघोस मतदान होईल असे जाहीर केले तसेच आमदार किशोर दराडे यांनी आपण मागील काळात केलेल्या कामाचे माहिती सर्वांसमोर स्पष्ट केली व पुढील काळामध्ये आपण काय काम करणार आहोत याबाबत सर्व शिक्षकांना माहिती दिली त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी सुद्धा पेन्शन घेणार नाही ही भूमिका किशोर दराडे यांनी स्पष्ट केली.

यावेळी बोलताना दराडे यांनी सांगितले की, येणाऱ्या अधिवेशनात टप्पावाढीचा निर्णय घेणार, आश्रम शाळेच्या वेळेत बदल करणार, आश्रम शाळांसाठी ४४०० वरून ४८०० ग्रेडपेला मान्यता द्यावी म्हणून प्रयत्न करणार,
माध्यमिक प्रमाणे आदिवाशी विभागाचे पगार १ तारखेलाच होणार, शिक्षकांचे मेडिकल बिले कॅशलेस करणार असे सांगितले.

गेल्या सहा वर्षात आमदारकीच्या काळात नाशिक विभागातील प्रत्येक शाळेसाठी काहीना काही देण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहणारे आमदार म्हणून दराडे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. यामुळे बहुसंख्य मतदार यावेळी आमदार दराडे बरोबर राहणार आहेत.
आमदार साहेब यांच्या हस्ते खर्डा शाळेचे गोकुळ गंधे सर यांची विस्तार अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल व मयूर भोसले सर यांनी विद्यार्थ्यांसमवेत जागतिक विक्रम केल्याबद्दल दोघांचा सत्कार करण्यात आला.


