जामखेड न्युज——
दाखल गुन्ह्याची माहिती देण्यास जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या कडून होतेय टाळाटाळ
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या आदेशाला केराची टोपली
जामखेड तालुक्यात सध्या गुन्ह्याचा आलेख वाढत चालला आहे. यात अवैध धंद्यांने डोके वर काढले असून यातच कलाकेंद्रवर होणाऱ्या हाणामाऱ्यांची भर पडली आहे. त्यातच जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती मला विचारल्याशिवाय पत्रकारांना देयची नाही असा अजब फतवा जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी काढला आहे. त्यामुळे घडलेल्या गुन्ह्याची माहिती देण्यास होत असलेल्या टाळाटाळीमागे काय गौडबंगाल तर नाही ना असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.
जामखेड तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट असून गुन्हेगारी देखील वाढत चालली आहे. दररोज काही ना काही गुन्हे जामखेड पोलीस स्टेशनला दाखल होत आहेत. याबाबतच्या माहिती साठी जामखेड तालुक्यातील पत्रकार पोलीस स्टेशनला गेले असता पोलीसांना माहिती मागितली असता पोलीस म्हणतात. साहेबांनी सांगितले आहे की, मला विचारल्याशिवाय कोणतीही माहिती पत्रकारांना देयची नाही. त्यामुळे तुम्हाला माहिती देऊ शकत नाहीत. माहिती न देण्याचा आजब फतवा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी काढला आहे.
त्यामुळे घडलेल्या गुन्ह्याची माहिती देण्यास होत असलेल्या टाळाटाळीमागे आरोपी व पोलीसांचे काही गौडबंगाल तर नाही ना असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. पोलीस निरीक्षकांकडून माहिती देण्यास होत असलेल्या टाळाटाळीमुळे पत्रकारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत लवकरच जामखेड तालुक्यातील पत्रकार पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.
चौकट
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या आदेशाला केराची टोपली
मागील काही महिन्यांपूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे हे जामखेड येथे आले असता जामखेड तालुक्यातील पत्रकारांनी त्यांची भेट घेऊन जामखेड पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती मिळत नाही असे सांगितले होते तेव्हा खैरे यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना घडलेल्या सर्व गुन्ह्याची माहिती पत्रकारांना देण्यात यावी असे सांगितले होते. मात्र तरी देखील महेश पाटील यांनी मला विचारल्याशिवाय कोणतीही माहिती पत्रकारांना देयची नाही अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या आदेशाला पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केराची टोपली दाखवली आहे.
पोलीस निरीक्षक माहिती का देत नाही याबाबत आरोपी व पोलीसांचे अर्थपूर्ण संबंध असावेत असा अंदाज आहे.