जामखेड न्युज———
कुकडीचे आवर्तन कोणाच्या प्रयत्नांनी?
कुकडीच्या आवर्तनावरून श्रेयवाद रंगला
अहिल्याानगर मधील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई तसेच पिण्यारच्या पाण्यांसाठी अहिल्या नगर आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी पिण्याईच्या पाण्याची केलेली मागणी विचारात घेवून मंत्री विखे पाटील यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी तसेच जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करून कुकडी डाव्या कालव्यांमध्ये पाणी सोडण्याण्या बाबत तातडीने निर्णय करण्यााच्या सूचना दिल्या आणि आज पाणी सुटले यावरून मात्र श्रेयवाद चांगलाच रंगला आहे.
पालकमंत्री राधाकृष्णन विखे पाटील, निलेश लंके, आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रेस नोंट काढून आमच्याच प्रयत्नांनी कुकडीचे आवर्तन सुटले अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत यामुळे नेमके कुणाच्या प्रयत्नांनी पाणी सुटले असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.
पालकमंत्री राधाकृष्णन विखे पाटील
अहमदनगर जिल्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतक-यांची मागणी लक्षात घेवून कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हााळी हंगामातील दुसरे आवर्तन दि.३० मे पासून सुरू होणार असल्या ची माहिती महसूल तथा जिल्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती.
कुकडीच्या आवर्तनाबाबत यापुर्वीच आवर्तनाच्या नियोजना संदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकी मध्ये आवर्तनाची तारीख नंतर ठरविण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र अहिल्याानगर मधील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई तसेच पिण्यारच्या पाण्यांसाठी अहिल्या नगर आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी पिण्याईच्या पाण्याची केलेली मागणी विचारात घेवून मंत्री विखे पाटील यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी तसेच जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करून कुकडी डाव्या कालव्यांमध्ये पाणी सोडण्याण्या बाबत तातडीने निर्णय करण्यााच्या सुचना दिल्या.
सद्यपरिस्थितीत कुकडी प्रकल्पाचा पाणीसाठा संपुष्टात आला असून, डाव्या कालव्याचे आवर्तन करण्यासाठी पिंपळगाव जोगे धरणातील मृत साठ्यातून पाणी घेणे आवश्याक होते त्यानुसार २५ मे पासून पिंपळगाव जोगे धरणातून येडगाव मध्ये पाणी घेण्यात येत असून, आवर्तनाच्या आज झालेल्यात निर्णयानुसार कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन गुरूवार दि.३० मे पासून सुरू करण्यााचा निर्णय घेण्यात आले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. उन्हााची तिव्रता लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करण्याचे अवाहनही त्यांनी केले आहे.
निलेश लंके
कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा विभागामार्फत गुरूवार दि. ३० रोजी दुपारी चार वाजता उन्हाळी आतर्वन सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मा. आ. नीलेश लंके यांनी जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे पाठपुरावा केला होता.
पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतामधील विशेषतः जनावरांच्या चाऱ्याची पिके, फळबागा, इतर शेतमाल जळण्याची भिती निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहिले होते. या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांनी मा. आ. नीलेश लंके यांच्याकडे मागणी करून शेवटचे उन्हाळी आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी केली होती.
कुकडी प्रकल्प सल्लागार समितीचे सदस्य सचिव तथा अधिक्षक अभियंत्यांकडे मा. आ. नीलेश लंके यांनी पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. कुकडी कालवा सल्लागार समिती व घोड प्रकल्पाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली २० ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कुकडी प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याचे सन २०२४ च्या उन्हाळी हंगामाचे आवर्तन सद्यस्थितीमध्ये हवामानाचा व पावसाचा अंदाज घेउन शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सोडण्याबाबत चर्चा झाली होती. तसे निर्देहशी अध्यक्षांनी दिले होते. याकडे लंके यांनी अधिक्षक अभियंत्यांचे लक्ष वेधले होते.
मतदार संघाचा आढावा घेतल्यानंतर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरीकांना पिण्यासाठी तसेच जनावरांच्या चारा पिकासाठी पाण्याची आवष्यकता आहे. त्यासाठी तातडीने आवर्तन सुरू करण्याची शेतकरी वर्गाकडून मागणी करण्यात आली. त्या मागणीचा विचार करून आवर्तन सोडण्याबाबत लंके यांनी मागणी केली होती.
आमदार रोहित पवार
कुकडी आवर्तन सोडण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मागणीला यश आले असून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेल्या मागणीनुसार आणि नंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार आज कुकडी प्रकल्पाचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे मतदारसंघातील ५४ गावांना पिण्यासाठी तसेच चारा व इतर पिकांना पाणी देण्यासाठी या आवर्तनाचा उपयोग होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मतदारसंघातील पाण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. त्यातही कर्जत-जामखेड मतदारसंघातील कुकडी कालवा हा महत्त्वाचा असून ५४ गावांमधील शेती या कालव्यावर अवलंबून आहे. मतदारसंघामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार या पार्श्वभूमीवर मागे दोन महिन्यापूर्वी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी कुकडी प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. तसेच नंतर पुन्हा याबाबतचे पत्र त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना दिले होते. त्यानुसार कुकडीचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून याचा फायदा चारा पिके, फळबागा, उन्हाळी पिकांना आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. तसेच या पाण्याने शेततळे देखील भरून घेण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून त्यांच्याकडून आमदार रोहित पवार यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत…
आमदार प्रा. राम शिंदे
कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा विभागामार्फत गुरूवार दि. ३०रोजी दुपारी चार वाजता उन्हाळी आतर्वन सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणीदार आमदार प्रा. राम शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे पाठपुरावा केला होता. यामुळे भुमीपुत्राच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतामधील विशेषतः जनावरांच्या चाऱ्याची पिके, फळबागा, इतर शेतमाल जळण्याची भिती निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहिले होते. या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांच्याकडे मागणी करून शेवटचे उन्हाळी आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी केली होती. यानुसार शिंदे साहेबांनी पाठपुरावा केला याला यश मिळाले आहे.
पालकमंत्री राधाकृष्णन विखे पाटील, निलेश लंके, आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रेस नोंट काढून आमच्याच प्रयत्नांनी कुकडीचे आवर्तन सुटले अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत यामुळे नेमके कुणाच्या प्रयत्नांनी पाणी सुटले असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.