जामखेड न्युज ——-
साक्षी वराट ने दहावीच्या परीक्षेत मिळवले 100 पैकी 100 टक्के गुण
जामखेड तालुक्यातील साकत येथील मुळचे रहिवासी विनोद अशोक वराट हे बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे नोकरी निमित्त स्थायिक आहेत. साक्षी ही येथील भामेश्वर विद्यालयात होती आज जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत साक्षीने 100 पैकी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
साक्षीचे आजोबा अशोक त्रिंबक वराट हे साकतचे माजी सरपंच व माजी चेअरमन होते. गावातील राजकारण व समाजकारणात ते नेहमी अग्रेसर असायचे कोरोना काळात दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.
साक्षीचे वडील विनोद अशोक वराट हे बीड जिल्ह्यात समाजकल्याण अधिकारी आहेत तर आई बीड जिल्हा परिषदेत पाटोदा तालुक्यात प्राथमिक शिक्षिका आहेत. चुलते शिवचंद वराट हे पाटोदा पंचायत समिती मध्ये नोकरीत आहेत.
साक्षी ही लहान पणापासूनच खुपच हुशार होती तिला चित्रकला व संगिताचीही आवड आहे. कला व संगीत चे पंधरा गुण मिळाले आहेत. यामुळे 100 टक्क्या पैकी 100 टक्के गुण मिळाले आहेत.
साक्षीच्या यशाबद्दल भामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व स्टाफ तसेच साकत पाटोदा परिसरातील मित्रमंडळी, नातेवाईक यांनी साक्षीचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.