कोरोनाची आकड्यात पारनेर व संगमनेरची आघाडी श्रीगोंदा व जामखेडची चिंता वाढली

0
255
जामखेड प्रतिनिधी 
         जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जिल्ह्यात बाधिताचा आकडा कमी – जास्त होत आहे. शुक्रवारी बाधितांचा आकडा वाढला होता. 593 एवढा होता आज परत कमी झाला आहे. जिल्ह्यात आज 393 बाधित आढळून आलेले  आहेत त्यामुळे कोरोना मुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी वाढलेले आकडे मोठा अडसर ठरत आहे.
     शुक्रवारी पारनेर 84, संगमनेर 60, श्रीगोंदा 57 तर पाथर्डी 50, जामखेड 33 असा आकडा होता शनिवारी परत थोडासा कमी झाला पारनेर 52, संगमनेर 52,श्रीगोंदा 38, जामखेड 33 असे आकडे जिल्हा प्रशासनाकडून जाहिर करण्यात आले आहेत. पण तालुका प्रशासनाकडून जाहिर झालेली आकडेवारी जास्त आहे. दि. 9 रोजी शुक्रवारी जामखेड मध्ये 584 अॅटिजेन तपासणी मध्ये 26 कोरोना बाधित आढळले तर आरटीपीसीआर मध्ये 17 असे एकुण 43 संख्या आहे.
     सध्या सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. या काळात शहरात मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे. लोक कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसतात सामाजिक अंतर पाळले जात नाही. बहुसंख्य लोक मास्क वापरत नाहीत यामुळे कोरोना आटोक्यात येण्याऐवजी वाढत चालला आहे. तसेच अनेक दुकाने चार नंतरही आतल्या दाराने सुरू आसतात शनिवारी व रविवारी सुद्धा काही दुकाने सुरू असतात.
     चौकट 
जिल्हा प्रशासनाची व तालुका प्रशासनाच्या आकडेवारीत ताळमेळच नाही.
   जिल्हा प्रशासनाकडून तालुकावार दररोज आकडेवारी जाहीर होते तसेच प्रत्येक तालुका प्रशासनाकडून आकडेवारी जाहीर होते पण दोन्ही आकडेवारीचा काहीच ताळमेळ दिसत नाही. शुक्रवारी दि. 9 रोजी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीत जामखेडची संख्या 33 आहे तर तालुका प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये अॅटिजेन मध्ये 26 बाधित तर आरटीपीसीआर मध्ये 17 बाधित आहेत. एकुण 43 होतात.
    खाजगी डॉक्टरकडे उपचार घेणाराची नोंदच नाही 
  शासकीय अॅटिजेन व आरटीपीसीआर तपासणी मोफत आहे. पण तरीही खाजगी दवाखान्यात पैसे भरून झटपट तपासणी करून आपले नाव जाहीर होऊ नये म्हणून अनेक लोक खाजगी दवाखान्यात उपचार घेतात त्यांची नोंद शासकीय स्तरावर नाही त्यामुळे प्रत्यक्षात जास्त रूग्ण आसताना कमी रूग्ण दिसतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here