जामखेड न्युज – – – –
नामदार शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली १२ जुलै ते २४ जुलै २०२१ शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये शिवसेना संपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे. लक्ष २०२२ हे अभियान शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून, मा. विश्वनाथ नेरुळकर(शिवसेना समनवयक) मा.संजय घाडी(शिवसेना संपर्कप्रमुख) डॉ विजय पाटील (शिवसेना सहसंपर्कप्रमुख) तसेच नंदकुमार मोरे विधानसभा संपर्कप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम नगर जिल्ह्यमध्ये कर्जत,जामखेड,पाथर्डी आणी शेवगाव या तालुक्यात शिवेसना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत
शिवसेना तालुकाप्रमुख, उपतालुकप्रमुख विभाग प्रमुख उपविभागप्रमुख त्याच प्रमाणे शाखाप्रमुख महिला आघाडी जिल्हा संघटक उपजिल्हासंघटक तालुका संघटक शहर संघटक युवासेना विधानसभा संघटक, तालुका संघटक उपतालुका संघटक सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदरचे कार्यक्रम पंचायत समिती गणामध्ये होणार आहेत.
सदरच्या दौऱ्यात कोरोना संदर्भात सर्व खबरदारी घेऊन ५० पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रत्येक पंचायत समिती गणात हा कार्यक्रम होणार आहे. गावातील प्रभाग निहाय शाखाप्रमुख, शाखा संघटिका, युवासेना शाखासंघटक बूथ प्रमुख नेमणे. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या याद्या तयार करणे जेणेकरून २०२२ च्या निवडणुकीस शिवसेना पूर्ण ताकद लावून उतरणार आहे. कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान केला जाणार असुन त्यांच्या अडचणी वरिष्ठ नेत्या पर्यंत पोहचवल्या जातील.
मनपा, नगर परिषद, नगर पंचायतीच्या प्रभागात देखील सदरचा कार्यक्रम खालील वेळापत्रकानुसार दिनांक १२ जुलै ते २४ जुलै २०२१ कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
दिनांक:-१२ जुलै सकाळी १० वाजता निमगाव(गां) येथे सुरुवात दुपारी १ मिरजगाव ४ वाजता कुळधरण.
दिनांक:- १३ जुलै सकाळी ११ वाजता खर्डा, ३ वाजता साकत येथे
दिनांक १४ जुलै
सकाळी १० वाजता चापडगाव दुपारी १ वाजता कोरेगाव, ४ वाजता जलालपूर
दिनांक १५ जुलै सकाळी ११ वाजता राशीन दुपारी ३ वाजता भांबोरा
दिनांक १६ जुलै सकळी ११ वाजता शेवगाव शहर (शेवगाव आणी पाथर्डी) दुपारी १ वाजता कर्जत (कर्जत आणी जामखेड)
दिनांक १७ जुलै सकाळी १० वाजता माणिकदौडी, दुपारी १ वाजता टाकळी मानूर, ४ वाजता अकोला
१८ जुलै सकाळी १० वाजता भालगाव, १ वाजता कोरडगाव ४ वाजता माळीबाभळगाव
१९ जुलै सकाळी १० वाजता मिरी १ वाजता करंजी ४ वाजता तिसगाव
२० जुलै सकाळी १० वाजता कासार पिंपळगाव,१ वाजता अमरापूर,४ वाजता भातकुडगाव
२१ जुलै सकाळी १० वाजता दहीगाव दुपारी १ वाजता एरंडगाव ४ वाजता मुंगी
२२ जुलै सकाळी १० वाजता बोधेगाव दुपारी १ वाजता लाडजळगाव ४ वाजता खरडगाव
दिनांक २३ जुलै सकाळी ११ वाजता जवळा ३ वाजता हळगाव अशा पद्धतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती प्रविण अनभुले (जिल्हाप्रसिद्धीप्रमुख नगर दक्षिण) यांनी दिली